DELHI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
मारुती कार कंपनीने शोधली १९८३ मध्ये विकलेली पहिली कार, कंपनीकडून केला संपूर्ण कायापालट,
मारुती सुझुकी कंपनीने अलिकडेच त्यांची पहिली प्रवासी कार मारुती ८०० रिस्टोर करून दिल्ली हेडक्वार्टरमध्ये शोकेस केली आहे.
या कारचं वितरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलं होतं. दिल्लीतले रहिवासी हरपाल सिंह यांनी पहिली कार खरेदी केली होती.
१९८३ मध्ये मारुती सुझुकी कंपनी सुरू
१४ डिसेंबर १९८३ रोजी कंपनीने त्यांची पहिली कार विकली होती.
मारूती सुझुकी कंपनी गेल्या ३९ वर्षांपासून भारतात जोरदार कामगिरी करत आहे. ही देशातली सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माती कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मारुती ही देशातली सर्वाधिक वाहनं विकणारी कंपनी आहे. या कंपनीने १९८३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते देशातल्या पहिल्या कारचं वितरण केलं होतं. दिल्लीतले रहिवासी हरपाल सिंह यांनी मारुतीची पहिली कार खरेदी केली होती. या कारला आता ३९ वर्ष पूर्ण झाली आहेत. मारुती कंपनीने आता ही कार रिस्टोर केली आहे आणि दिल्लीतल्या त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये शोकेस केली आहे. तब्बल ३९ वर्ष जुनी पहिली मारुती ८०० ही कार अजूनही तशीच दिसते. आम्ही येथे कारचे जुने आणि नवीन दोन्ही फोटो शेअर केले आहेत जेणेकरून तुम्हाला दोन्ही कार्समधील फरक समजून घेता येईल. कंपनीने या कारचा संपूर्ण कायापालट केला आहे.
३९ वर्षांपूर्वी ४७,५०० रुपयांत पहिल्या कारची विक्री
१९८३ मध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड कंपनी भारतात सुरू झाल्यानंतर १४ डिसेंबर रोजी कंपनीने एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांच्या सुरुवातीच्या कार्सचं वितरण केलं.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्या कारची चावी हरपाल सिंह यांना सुपूर्द केली होती. तेव्हा या कारची किंमत ४७,५०० रुपये इतकी होती. २०१० साली हरपाल यांचं निधन झालं. त्यांच्या माघारी त्यांच्या कारची नीट देखभाल केली गेली नाही.
हरपाल सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी कंपनीशी संपर्क करून कार रिस्टोर करण्यास सांगितलं. त्यानंतर कंपनीने या कारचा कायापालट केला. कार जशी ३९ वर्षांपूर्वी होती अगदी तशीच पून्हा बनवून कंपनीने ती कार त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये शोकेस केली आहे.
या बातमीचे प्रायोजक आहेत
CAROLDPART CO. PVT. LTD. MUMBAI
WWW.CAROLDPART.COM
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.