KOLHAPUR : शिल्लक 28 कोटीतून कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी :आमदार प्रकाश आवाडे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : शिल्लक 28 कोटीतून कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी :आमदार प्रकाश आवाडे



KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

इचलकरंजी : शिल्लक 28 कोटीतून कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी :आमदार  प्रकाश आवाडे यांची पञकार बैठकीत माहिती

इचलकरंजी नगरपालिका कर्मचाऱ्यांची थकीत देय रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाने नगरपालिकेला 98 कोटी रुपये अनुदान दिले होते. त्यातून कर्मचार्‍यांची सर्व देय रक्कम देऊन सुमारे 28 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातून शहराचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी कृष्णा योजनेला गळती लागणारी जलवाहिनी बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

इचलकरंजी नगरपालिकेला कर्मचार्‍यांची थकीत देय रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून 98 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यातून 71 कोटी रुपये कर्मचार्‍यांची देत रक्कम अदा करूनही नगरपालिकेकडे सुमारे 28 कोटी रुपये आता शिल्लक राहिले आहेत. या शिल्लक रकमेतून मक्तेदारांची देयके अदा करण्याचा काहींचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्या शिल्लक रक्कमेतून कृष्णा योजनेला वारंवार गळती लागणारी जलवाहिनी बदलण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतेही नियोजन केलेले नाही. उलट पुन्हा मक्तेदारांचीच देयके देण्यासाठी काहींचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन इचलकरंजी महापालिकेला दिलेल्या 98 कोटी रुपये अनुदानापैकी शिल्लक रकमेतून कृष्णा योजनेची गळती लागणारी जलवाहिनी बदलण्याची मागणी केली आहे. कृष्णा पाणी पुरवठा योजना आणि कट्टीमोळा पाणी योजनेसाठी आवश्यक खर्च केल्यास शहराला एकदिवस आड पाणी पुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना दिल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, स्वप्निल आवाडे, अहमद मुजावर, सर्जेराव पाटील, मौश्मी आवाडे, एम.के. कांबळे, दीपक सुर्वे, महेश पाटील, राजू बोंद्रे, राहुल घाट, नरसिंह पारीक, सचिन हेरवाडे, नितेश पोवार उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली