Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR: केवळ एका जातीपुरता लोकशाहीर अण्णा भाऊंचा विचार बंदिस्त न करता प्रत्येक समाजातील उपेक्षितांच्या पालापर्यंत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे.- विजय सुवासेKOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी :विनोद शिंगे

केवळ एका जातीपुरता लोकशाहीर अण्णा भाऊंचा विचार बंदिस्त न करता प्रत्येक समाजातील उपेक्षितांच्या पालापर्यंत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे.- विजय सुवासे

         केवळ एका जातीपुरता अण्णा भाऊंचा विचार बंदिस्त न करता प्रत्येक समाजातील उपेक्षितांच्या पालापर्यंत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे कारण संपूर्ण समाज बदलल्याशिवाय सामाजिक क्रांती घडत नाही सामाजिक क्रांती घडवायची असेल तर पहिल्यांदा तुमचा मार्ग निश्चित करावा लागेल असे गौरव उद्गार विजय सुवासे यांनी काढले 
       ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ कुंभोज यांच्या वतीने सदर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथून त्यांच्या राहत्या घरातून मशाल घेऊन कुंभोज येथील कार्यकर्ते कुंभोजला रवाना झाले, यावेळी वाटेगाव येथे सदर मशालीची पूजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले.


          कुंभोज एसटी स्टँड परिसरात क्रांती मशालीचे भव्य स्वागत करण्यात आले. सदर मशाल रॅलीचे दसरा चौक मार्गे,समाज मंदिरात आगमन झाले.यावेळी ग्रामपंचायत कुंभोज यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व गावातील विविध संस्थांच्या वतीने सदर मशालीला व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
      यावेळी समाज मंदिर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन कुंभोज ग्रामपंचायत सरपंच अरूणादेवी पाटील, उपसरपंच अनिकेत चौगुले ,जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ,वारणा दूध संघाचे  संचालक अरुण पाटील, माजी सरपंच किरण नामे ,प्रकाश पाटील, सुनील घाटगे ,धनाजी तिवढे, मा उपसरपंच दावीत घाटगे,सदाशिव महापुरे,सुदशन चौगुले, ग्रामपंचायत सदस्य पौर्णिमा भोसले, जयश्री जाधव माधवी माळी, विशाखा माळी, भारती पोद्दार, संभाजी मिसाळ ,अमरजीत बंडगर, अजित देवमोरे,लखन भोसले, वैभव जमणे ,राजू कुरणे, सागर सुवासे, विजय सुवासे,अविनाश घाटगे,जहागिर हजरत तसेच अण्णाभाऊ साठे तर मंडळातील सर्व उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच किरण नामे व महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील,वैभव जमणे,यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विजय सुवासे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली