KOLHAPUR : हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीचे स्वागत ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीचे स्वागत ...KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीचे स्वागत ...

कुंभोज तालुका हातकणंगले येथे देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित राष्ट्रीय काॅग्रेस पक्षातर्फे आमदार राजुबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली कुंभोज,नरंदे,लाटवडे,भेंडवडे,खोची,वाठार परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली.या रॅलीत मोठ्या प्रमाणात काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.मुख्य बसस्थानक परिसरात येथील काॅग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी जंगी स्वागत केले.यावेळी आमदार राजीव आवळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या घोषणांनी परिसर दणदणून निघाला. यावेळी कुंभोज दीपक चौक, आंबेडकर चौक, एसटी स्टँड परिसरातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सदर रॅलीमध्ये आमदार राजू बाबा आवळे यांच्या सह हातकणगले तालुका काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहिले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा ध्वज व स्वातंत्र्याच्या घोषणाने परिसरात वातावरण भक्तिमय बनले होते    
     सदर तिरंगा रॅलीचे कुंभोज, वठार, नरंदे, खोची,लाटवडे भेंडवडे परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले, यावेळी बोलताना आमदार राजू बाबा आवळे म्हणाले की भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक वीर जवानांनी आपल्या प्राण्यांचीआहुती दिली आहे, स्वातंत्र्य सैनिक व वीर जवानांच्या आहुतीमुळेच आपण आज चांगले दिवस पाहत आहोत. स्वातंत्र्य चळवळीसाठी काँग्रेस पक्षाची ही योगदान उल्लेखनीय असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे याचा मला रास्त अभिमान आहे.
  यावेळी किरण माळी,सदा महापूरे,दाविद घाटगे,सचिन कोळी,राजन डोणे,प्रल्हाद लोखंडे,सचिन पुजारी,आप्पासो पाटील,रावसो कांबळे,मुक्ताराम सुवासे,डाॅ.धर्मवीर पाटील माजी सरपंच प्रकाश पाटील, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष भगवान जाधव नरंदे गावचे माजी सरपंच राजू भोसले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची माजी चेअरमन सर्जेराव माने, बाजीराव सातपुते,रमेश पाटोळे,युवराज पाटील, सरपच शंकर शिंदे तसेच हातकणगले तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी  उपस्थीत होते.गावातील प्रमुख मार्गावरून रॅली नरंदेकडे मार्गस्थ झाली.नरंदे येथील श्रध्दास्थान नागनाथ मंदीरात रॅलीची सांगता झाली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली