KOLHAPUR : कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारKOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे

कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  शिका संघटित व व संघर्ष करा हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला परिणामी सध्याच्या स्पर्धेच्या युगात मोठ्या प्रमाणात अभ्यासामध्ये परिवर्तन होत असून सध्या मोबाईलचे युग आले आहे. त्याच पद्धतीने अभ्यासात अमुलाग बदल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासाचेच आचरण करावे व स्वतःला त्या क्षेत्रातील उच्च ध्येयापर्यंत पोहोचवावे. आज कुंभोज परिसरात गुणवंत व गुणवान विद्यार्थ्यांची संख्या जरी जास्त असली तरी यूपीसी व एमपीएससी परीक्षेमध्ये भाग घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
           परिणामी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याया विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी  ग्रामपंचायत कुंभोज व ग्रामस्थ सतत प्रयत्नशील राहतील असे गौरव उदगार महाविकास आघाडिचे गटनेते किरण माळी यांनी काढले


   ते कुंभोज ता हातकणंगले येथे ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा आँगस्ठ रोजी आयोजित दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कुंभोज च्या सरपंच अरुणादेवी पाटील ह्या होत्या. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,रयत पब्लिक स्कूल, बाहुबली विद्यापीठ बाहुबली या संस्थांमध्ये दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या आयोजन ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने कन्या शाळा येथे करण्यात आले होते.
 यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
     यावेळी ग्रामपंचायत सरपंच अरुणादेवी पाटील उपसरपंच अनिकेत चौगुले, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी माळी, जयश्री जाधव, माधुरी घोदे, स्मिता चौगुले, विशाखा माळी, भारती पोतदार ,सदाशिव महापुरे, दावीद घाटगे आप्पासाहेब पाटील, सुदर्शन चौगुले ,विनायक पोद्दार रावसाहेब पाटील ,संभाजी मिसाळ ,अशोक आरगे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवी, रवी जाधव, ऋतुराज तोरस्कर, प्रभाकर घोदे, भरत भोकरे, लखन भोसले, राहुल कत्ते तसेच पालक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या विशाखा माळी महा विकास आघाडी गटनेते किरण माळी यांनी मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली