Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : कुंभोज येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने होते सात मित्राची तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पुजा...




KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

कुंभोज येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने होते सात मित्राची तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पुजा...

कुंभोज तालुका हातकणंगले येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणाऱ्या सात मित्रांची साई समर्थ तरुण मंडळाची आजची गणेशाची प्रतिष्ठापना मंडळाचे माजी अध्यक्ष व सदस्य इनुस मुनीर सुतार परिवाराच्या वतीने करण्यात आली गेल्या दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सात मित्रांची तरुण मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची संख्या असून सदर मुस्लिम बांधव गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.



 गेल्या अनेक वर्षापासून मंडळाचे अध्यक्ष तुषार शिंगे,इनुस सुतार यांच्या माध्यमातून अनेक मुलांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या साथ मित्रांची तरुण मंडळाची स्थापना केली. सदर तरुण मंडळामध्ये हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेचे प्रतिक असणाऱ्या अनेक मुस्लिम बांधवांचा समावेश असून हे मुस्लिम बांधव गेल्या दहा वर्षापासून गणेश मूर्तीची स्थापना करतात. सदर व गणेश मूर्तीची आराधना पुजा दररोज त्यांच्या वतीने केली जाते त्याच पद्धतीने दररोजच्या आरतीचा मान हे मुस्लिम समाजातील परिवारालाच आहे. सदर कार्यक्रमांमध्ये ते सहकुटुंब सहपरिवार मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.




 त्यामुळे हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेच प्रतिक असणारे सात मित्रांची तरुण मंडळ असे गावात नावलौकिक असून. अत्यंत शांततेने व निसर्गप्रेमी गणेशोत्सवाची ते स्थापना करतात. यासाठी त्यांना पत्रकार विनोद शिंगे यांचे सहकार्य लाभते सदर तरुण मंडळामध्ये किरण पाटील, इनुस सुतार सादिक सुतार, निलेश शिंगे, तुषार शिंगे, मोहसीन सुतार फारुख सुतार,अजित माने ,स्वागत पाटील, सज्जात सुतार, अरमान सुतार, राहुल शिंगे, आधी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सदर मंडळाच्या वतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये समाज उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली