Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : माऊली महिला विकास संस्था महिलांच्या हिमालयासारखे पाठीशी.... आमदार हसन मुश्रीफ साहेब यांचे प्रतिपादन..
KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

कागल माऊली महिला विकास संस्था महिलांच्या हिमालयासारखे पाठीशी....
आमदार हसन मुश्रीफ साहेब यांचे प्रतिपादन..
उद्योजक महिलांना व महिला बचत गटांना देणार प्रोत्साहन.कागल तालुक्यातील व्हन्नाळी गावच्या सौ.सुजाता राजेंद्र माळी व सौ.अश्विनी संजय कुळूमोडे यांनी माऊली महिला विकास संस्थेच्या माध्यमातून अगरबत्ती, कापूर व दैनंदिन वस्तूंचे व्यवसाय उद्योग सुरू करण्यात आले. माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसनसो मुश्रीफ साहेबांची भेटून कृतज्ञपूर्व आभार व्यक्त करत, आपण सुरू केलेल्या उद्योग व्यवसायाची माहिती दिली. यावेळी आ.हसनसो मुश्रीफ साहेब म्हणाले, आपण सुरू केलेल्या उद्योग व्यवसायाला खूप सार्‍या शुभेच्छा. माऊली महिला विकास संस्था महिलांच्या हिमालयासारखी पाठीशी आहे. येणाऱ्या काळात उद्योजिका महिला व महिला बचत गटांना प्रोत्साहन देणार.
           संस्थेच्या प्रशिक्षिका सौ.दिंडे म्हणाल्या, माऊली महिला विकास संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या लहू उद्योगाचे प्रशिक्षण माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी दिले. मुश्रीफ साहेबांनी, महिला सक्षमीकरणासाठी सर्वांगीण विकास हा ध्यास मनात घेऊन माऊली महिला विकास संस्थेची स्थापना केली.         नवउद्योजिका सौ.अश्विनी संजय कुळूमोडे व सौ.सुजाता राजेंद्र माळी आणि मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, या उद्योग व्यवसायासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.अमरीन नविद मुश्रीफ, कार्याध्यक्षा सौ.नबिला अबिद मुश्रीफ व प्रशिक्षिका सौ.गंधाली सुहास दिंडे यांनी मला उद्योगासाठी प्रोत्साहित व मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी मला अगरबत्ती कशी करायची शिकवले, त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या गावांमध्ये माऊली महिला विकास संस्थेच्या माध्यमातून हा उद्योग सुरू केला व आम्हांला विक्रीसाठी माऊली महिला विकास संस्थेचे सहकार्य लाभले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली