MUMBAI : भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांचे आंदोलन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांचे आंदोलन...MUMBAI

लोकसंदेश न्यूज नेटवर्क

*भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्यासह शिवसेना आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन...**भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्याची घोषणाबाजी...*

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली.मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना भात खरेदीच्या वरती देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम मिळालेली नाही. त्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो शेतकरी आज बोनसच्या रक्कमे पासून वंचित आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी या मागणीसाठी आज शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार वैभवजी नाईक यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

कोकणातल्या शेतकऱ्यांना भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्यासह आमदारांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली