MUMBAI: बच्चू कडूंचे विरोधकांना थेट चॅलेंज; म्हणाले,“असं नामर्दासारखं काय बोलताय? मर्दानगी असेल तर.... -------

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI: बच्चू कडूंचे विरोधकांना थेट चॅलेंज; म्हणाले,“असं नामर्दासारखं काय बोलताय? मर्दानगी असेल तर.... -------




MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

बच्चू कडूंचे विरोधकांना थेट चॅलेंज; म्हणाले,“असं 
नामर्दासारखं काय बोलताय? मर्दानगी असेल तर.... 

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीचा राडा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच, ‘५० खोके’ घोषणेवरून विरोधकांना थेट चॅलेंज दिले आहे.

विधानभवनात अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून बच्चू कडूंनी खोचक शब्दांत विरोधकांवर टीका केली आहे. अमोल मिटकरींना लक्ष्य करत बच्चू कडू म्हणाले, “मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते”.


“५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या”, असे आव्हान बच्चू कडूंनी विरोधकांना दिले आहे.

दरम्यान, दोन्ही गटांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बाचाबाची झाली, तेव्हा नेमकं काय घडलं, यावर बच्चू कडूंनी भूमिका मांडली आहे. “आधी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली होती. ते सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार तिथे अचानक आले. वास्तविक त्या पायऱ्यांवर कुणी आधीपासून नारेबाजी करत असेल, तर दुसऱ्याने जाऊ नये असा प्रघात आहे. पण असं असताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे आमदार मागे उभे न राहाता गोल उभे राहिले. म्हणजे आधी त्यांनी चूक केली. उलट म्हणायला लागले की सत्ताधाऱ्यांना माज आला”, असे बच्चू कडू म्हणाले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली