SANGLI : महापालिका साकारणार विद्यार्थ्यांचा तिरंगा : चार शाळा होणार सहभागी: 15 ऑगस्ट रोजी केला जाणार तिरंगा विदयार्थी उपक्रम....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : महापालिका साकारणार विद्यार्थ्यांचा तिरंगा : चार शाळा होणार सहभागी: 15 ऑगस्ट रोजी केला जाणार तिरंगा विदयार्थी उपक्रम....



SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी , सांगली

महापालिका साकारणार विद्यार्थ्यांचा तिरंगा : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली चार शाळा होणार सहभागी: 15 ऑगस्ट रोजी केला जाणार तिरंगा विदयार्थी उपक्रम

आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांचा समावेश असणाऱ्या तिरंगा राष्ट्रध्वज साकारला जाणार आहे. या साठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली चार खासगी शाळा आणि मनपाच्या शाळातील 1 हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. याबाबतची नियोजन बैठक महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडली.



15 ऑगस्ट रोजी 1 हजार विद्यार्थी तिरंगा गणवेशात एकत्र येऊन तिरंगा राष्ट्रध्वज साकारणार आहेत. यासाठी आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कुल, तक्षशिला स्कुल, रजपूत स्कुल आणि पोदार या शाळांनाही सहभाग दर्शविण्याची तयारी दर्शविली आहे. या उपक्रमाच्या नियोजनाची बैठक आज उपायुक्त राहुल रोकडे आणि उयायुक्त चंद्रकांत आडके यांच्या उपस्थितीत पार पडली.

 बैठकीस शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी गीता शेंडगे, लेखापाल गजानन बुचडे , तक्षशिलाच्या जयश्री पाटील, रजपूत स्कुलच्या किमया रजपूत, पोदारचे बजरंग पाटील आणि अप्पासाहेब बिरानाळे यांची उपस्थिती होती. यावेळी 15 ऑगस्ट रोजी खासगी अंडी मनपा शाळांचे 1 हजार विद्यार्थी एकत्र येऊन तिरंगा ध्वजाची प्रतिकृती साकारणार आहेत. आशा प्रकारचा पहिलाच उपक्रम महापालिका घेत असून तिरंगा रंगातील पोशाख परिधान करीत हे सर्व विद्यार्थी आपला राष्ट्रध्वज साकारणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी हा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले.

लोकसंदेश न्यूज मिडीयम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली