SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली मनपा आयुक्त सुनील पवार यांच्याकडून गणपती उत्सव तयारीचा आढावा : मिरवणूक मार्गाबरोबर विसर्जन ठिकाणाची केली पाहणी
सांगली: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा आज आयुक्त सुनील पवार यांनी घेतला. यावेळी आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी अधिकाऱ्यांसह कृष्णा नदीवरील घाटांची पाहणी करीत गणेशोत्सवाबाबत आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना दिल्या.
आज आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांनी सरकारी घाट,समर्थ घाट, विष्णु घाट परिसराला
भेट देऊन तेथील तयारीची माहिती घेतली. यावेळी मिरवणूक मार्गावरील खड्डे मुजवण्यापासून ते मूर्तीदान केंद्रापर्यंतची सर्व व्यवस्था दोन दिवसात पूर्ण करा अशा सूचनाही आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासनाला केल्या. यावेळी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, नगरअभियंता परमेश्वर अलकुडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, सहायक आयुक्त नितीन शिंदे, एस एस खरात, अशोक कुंभार, उप अभियंता ऋतुराज यादव, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्राणिल माने, किशोर कांबळे, राजू गोंधळे आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली