SANGLI:यंदाचा गणेशोत्सव इको फ्रँडली साजरा करावा :हरित गणोशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेणेचे उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI:यंदाचा गणेशोत्सव इको फ्रँडली साजरा करावा :हरित गणोशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेणेचे उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन

L

SANGLI:
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली

यंदाचा गणेशोत्सव इको फ्रँडली साजरा करावा : महापालिकेत पार पडली नियोजन बैठक : सोमवारपासून ऑनलाईन परवानगी प्रक्रिया सुरू होणार : तर हरित गणोशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेणेचे उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन



सांगली : यंदाचा गणेशोत्सव सर्वानी पर्यावरणपूरक आणि इको फ्रँडली साजरा करावा असे आवाहन महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे. तसेच आगामी गणेशोत्सवासाठी मनपा यंत्रणेच्या तयारीचा आढावाही उयायुक्त राहुल रोकडे यांनी घेतला.



आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेत आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांनी नियोजन बैठक घेतली. बैठकीस उपायुक्त चंद्रकांत आडके, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेले प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी तसेच स्वछता निरीक्षक उपस्थित होते. 


 या बैठकीत गत गणेशोत्सवात महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेची आणि उपक्रमाची माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी घेतली. तसेच आगामी गणेशोत्सवासाठी यंत्रणेची नेमकी कशी तयारी आहे याचाही आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना उपायुक्त रोकडे यांनी सोमवारपासून गणेश मंडळांसाठी ऑनलाईन पद्धतीने परवानगी प्रक्रिया सुरू केली जात आहे. 


यासाठी ऑनलाईन लिंकचा वापर करून गणेश मंडळांनी आपल्या परवानगीची रीतसर मागणी करावी. ऑनलाईन लिंक लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाईल. याचबरोबर सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी यंदाचा उत्सव हरित आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन गणेशोत्सव, हरित उत्सव आणि इको फ्रेंडली उत्सव याबाबत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी सहभागी व्हावे. गणेशउत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे मुजविण्याचे नियोजन करण्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले असून उर्वरित कामही गतीने सुरू करण्यात आले आहे.



 गणेशमूर्ती दान करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिली जाणार असून नागरिकांनी निर्माल्य हे कुंडात टाकावे असे आवाहन ही रोकडे यांनी केले. याचबरोबर मनपाक्षेत्रात फिरते विसर्जन कुंडाची संख्या वाढवण्यात येणार असून पर्यावरण पूरक उत्सवासाठी जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळाच्या आजुबाजूला स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उत्सव काळात सार्वजनिक मुताऱ्या , स्वच्छता गृहे दररोज दोनवेळा स्वच्छ करण्याबरोबर आवश्यक ठिकाणी तात्पुरते शौचालय बसवण्यात येणार आहेत . उत्सव काळात विसर्जन ठिकाणी मनपाक्षेत्रात पाच वैद्यकीय पथके रुग्णवाहिकेसह सज्ज करण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्य नदीत पडू नये यासाठी निर्माल्य कुंडाची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासह उपनगरात कृत्रिम विसर्जन तळी उभारण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी हरित आणि इको फ्रेंडली साजरा करावा असे आवाहनही उपायुक्त राहुल रोकडे यांनी अधिकाऱ्यांना केले आहे. याचबरोबर दोन दिवसात नगरसेवक पदाधिकारी तसेच सामाजिक संस्था यांची बैठक घेऊन गणेशोत्सवबाबत अंतिम नियोजन करण्यात येणार असल्याचेही उपायुक रोकडे यांनी स्पष्ट केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली