SANGLI : ऑफ बडोदा या बँकेची १६ कोटी ९७ लाख रु. फसवणुक करणा-या सी एन एक्स कंपनीचा मॅनेजर अजित नारायण जाधव यास अटक,

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : ऑफ बडोदा या बँकेची १६ कोटी ९७ लाख रु. फसवणुक करणा-या सी एन एक्स कंपनीचा मॅनेजर अजित नारायण जाधव यास अटक,सांगली
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

बैंक ऑफ बडोदा या बँकेची १६ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणुक करणा-या सी एन एक्स कंपनीचा एरिया मॅनेजर अजित नारायण जाधव वय 45 रा.विश्राम बाग यास अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

मिरज शहर पोलीस ठाणे  दि. २/११/२०१० रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान शेतक-यांचे नावे शेती माल ठेवुन त्यांचे नावावर बँक ऑफ बडोदा, शाखा-मिरज या बँकेत तारणमाल कर्ज काढून माल परस्पर विक्री करुन 
शेतक-यांचे नावे काढलेले कर्ज थकीत ठेवून कराराचा भंग करुन बँक ऑफ बडोदा या बँकेची १६ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणुक केलेबाबत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे.सदर गुन्ह्यातील सी एन एक्स (कमोडीटी नेक्स्ट) कार्पोरेशन लि. मुंबई या कंपनीचा एरिया मॅनेजर अजित नारायण जाधव यास काल दि. २९/०८/२०२२ रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक केली आहे. त्यास मा. न्यायालयाने दि. ५/०९/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झालेली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. दिक्षीत गेडाम व अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे. विनोद कदम, दिपक रणखांबे यांनी केलेली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली