SANGLI
अंधेर नगरी चौपट राजा ..टके सेर भाजी ...टके सेर खाजा.... सांगली ग्रामपंचायत उर्फ महानगरपालिकेची अवस्था
अंधेर नगरी चौपट राजा ..टके सेर भाजी ...टके सेर खाजा.... अशी एक म्हण आहे ,याचा प्रत्यय आता सांगली महानगरपालिका जी ग्रामपंचायतीच्या लायकीची आहे ...येथे येत आहे .. गेली वीस वर्षे झाली सांगली नगरपालिका... महापालिका झाली .. परंतु इथले सगळे आस्थापन आणि व्यवस्थापन सांगलीकरांना ग्रामपंचायतीचेच मिळत आहेत ....मागे आम्ही एका लेखात "सांगलीला ग्रामपंचायत करा" जे म्हटले होते ...ते निच्छित करण्याचे व योग्य असल्याचे सांगली महापालिकेच्या प्रशासनाने दाखवून दिलेले आहे
आता आपल्या महापालिकेचे अधिकाऱ्यांबाबतीत आता एक शंका अशी येत आहे की, हे अधिकारी खरोखरच शिक्षित आहे का ? का उगाच आपल कॉपी करून पास झालेले आहेत? त्याच्या बाबतीत आता सांगलीकराना शंका येत आहे ,याचं कारण असं आहे की, घरपट्टी देताना मोकळ्या प्लॉटला ज्याला पाण्याच कनेक्शनच नाही त्याला सुद्धा पाण्याची बिल सादर केली गेली.... आता ही कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यातून आली असेल
....कदाचित हे पाचवी किंव्हा सातवी पास असावेत... किंवा परीक्षा कॉपी देऊन नाहीतर ते लाच देऊन अधिकारी झालेत असावेत ... अशी आमची शंका आहे
आम्ही अधिकारी झालो म्हणजे... आम्ही काहीही करू .जनतेचा विचार करणार नाही अशी धारणा कदाचित या सांगलीच्या प्रमुख अधिकारी पासून खाली शिपायापर्यंत झालेली दिसत आहे ...आमच्या येथील सर्व पक्षाचे पुढारी फक्त पांढरे कपडे घालून आपल्याला मला काय मिळते का? याच्यावर लक्ष ठेवून काम करत असल्याचे दिसत आहे .. त्यांना देखील या जनतेशी काही देणे घेणे नसावे... कोणत्याही पक्षाचा कोणताही नगरसेवक या विषयावर बोलायला तयार नाही. . साखळकर सारख्या काही संघटनाच फक्त याच्यात आवाज उठवते याचे गौड बंगाल काही कळायला मार्ग नाही...
साधं सोपं सरळ गणित आहे ...काही बोगस कनेक्शन धारकांचे बोगस कनेक्शन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर .. सर्व मोकळ्या प्लॉट, मोकळ्या घरांना, ज्यांना पाणी कनेक्शन नाहीत त्यांना पाण्याची बिल देण्याचा प्रताप आयुक्त पासून शिपायापर्यंत करण्यात आलेला आहे...
ज्याला पाणी कनेक्शन नाही त्याला पाण्याची बिल दिली नाही पाहिजेत !! पण सर्व सांगली महापालिकेहद्दीतल्या मोकळ्या प्लॉट धारकांना व ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना सुद्धा ही बिले अशांना सुद्धा ही बिल गेली... म्हणजे सांगली महानगरपालिका कशी ग्रामपंचायतच्या लायकीची आहे आणि त्याचे अधिकारी एखाद्या ग्रामसेवकाप्रमाणे कसे काम करतात याचं छान उदाहरण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या सांगली महापालिकेच्या शिवाय असू शकत नाहीं.....
या प्रमुख अधिकाऱ्यानी चमकोगिरी शिवाय दुसरं काहीही केलेलं नाही... चमकोगिरी करून आपली बातमी प्रमुख चार-पाच पेपर मध्ये कशी येईल याच्यासाठी एक यंत्रणा लावलेली आहे... अरे बाबांनो तुम्ही चमका... जरूर चमका ...परंतु कामे करा.... आपला जो पगार घेता तो ...जनतेच्या पैशातूनच घेताय.... परत जनतेवरच तुम्ही कर आणि पाण्याचे नसलेली बिल लादता..... याची जरा थोडी अक्कल तुम्हाला असेल तर हे तुम्ही केलं नसतं.... चमकोगिरी करण्यातच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हसील आहे ....सांगली सारख्या कृष्णा नदीकाठावर असलेल्या शहरात पाणीपुरवठ्याची सुद्धा समस्या सांगलीकर दहा वर्ष भोगत आहेत ....त्यांना योग्य रीतीने स्वच्छ व वेळेवर पाणी मिळत नाही, पण हे अधिकारी याच्यावर काही बोलायला तयार नाहीत... दुसर म्हणजे सांगलीतल्या कुठल्याही रस्त्याला खड्डा नाही असं दाखवा एक हजार रुपये मिळवा, ची घोषणा करण्याची वेळ आलेली आहे ...
आणि हे अधिकारी प्रमुख रस्त्यावर घोडी, हत्ती, आणि बोकडाची पुतळे उभे करून काय साध्य करण्याचं ठरवल आहे ...यांचं गणित आम्हाला कळून येत नाही ... नागरिक रस्त्यांच्या खड्ड्यांमधून जात असताना ह्या सर्व संबंधितांच्या मातोश्रींच्यासह या, घोडे हत्ती व बोकडांचा उल्लेख नागरिक करत जात आहेत... याची शरम आपल्याला वाटायला पाहिजे. .
एखाद्या म्हाताऱ्या माणसाला किंवा म्हाताऱ्या व्यक्ती
ला चांगला मेकअप चांगले कपडे व पावडर लावल्यानंतर ती व्यक्ती म्हातारीच राहते.... अशी अवस्था सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची झालेली आहे त्यामुळे हे चमकोगिरी करणारे अधिकाऱ्यानी आता.. ही चमकोगिरी बंद करून सांगलीकर जनतेच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे
कारण जे चौकाचौका सुशोभीकरण तर ते, बगीचे , भिंती रंगवणे ,रणगाडे आणणे, आता हे धंदे बंद करा... याच्यामधून जनतेच्या पैशाचा अपव्य होत आहे आणि त्याचा सर्वसाधारण जनतेला काहीही फायदा नाही
(याचा फायदा सकाळ सकाळी बरमुडा घालून आपल्या महागड्या कुत्र्यांना सगळ्या सांगलीतून शि व शू करवणाऱ्या काही धनाड्य व अतिशिक्षित लोकांना नक्की होईल) परंतु सर्वसाधारण माणसाला गरिबांना याचा काही फायदा नाही
त्याच पैशातून
सांगलीकरांना चांगला न्याय द्या.. त्यांना चांगलं वेळेवर पाणी द्या, चांगले स्ट्रीट लाईट द्या ,त्यांना चांगले रस्ते द्या, उगाच चमकोगिरी करून चार संस्थाना धरून आणि चार भिंती रंगवल्या म्हणजे म्हाताऱ्या सांगली महापालिका फार मोठी झाली अशातला भाग राहत नाही
आम्ही जाणीवपूर्वक ज्येष्ठ नागरिक आणि संपादक म्हणून मी आपणास हे कळू इच्छितो की, जरा हे धंदे बंद करा आणि तेच पैसे रस्त्यावर, लाईटवर, गटारी आणि पाण्यासारखा समस्येवर, नागरिकांच्या घराजवळील हिंस्र कुत्री,
रस्त्यावरची मोकाट जनावरे , प्रत्येक चौकात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यावर द्या,असे अनेक मूलभूत प्रश्नावर लक्ष देऊन खर्च करा ..
एवढ तरी डोक आपणास असेल असं आम्ही ग्राह्य धरतो.. का तर तुम्ही चार बुकं शिकून ह्या पदावर आलेला आहात..
.... सर्व आधिकार् यांना व कर्मचाऱ्यांना आमचा सल्ला असेल की, ही चमकोगिरी बंद करून सांगलीला , यामध्ये सर्वसाधारण नागरिकांचा काही फायदा होइल असे काम करा.... ,आता हे सांगलीकर तुमच्यावर नाराज आहेत, चिडून आहेत...
सांगली मधून बाहेरगावातून येणारा वाहक आपली सांगली पास करून जाताना या खड्ड्यामुळे या हत्ती,घोडे, बोकड व कारंजासह आपल्या मातोश्रींचा पण उल्लेख करत जात असतात ...तर याची शरम जरा बाळगा आणि हे धंदे बंद करा त्वरित पाण्याची दिलेली बील त्वरित रद्द करा ...
अन्यथा सांगलीत सर्व संघटना तुमच्यावर कायदेशीर मार्गाने आंदोलन करून करून तुम्हाला कोर्टात सुद्धा खेचण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.... याची आम्ही तुम्हाला समज देतो.....
संपादक : सलीमभाई नदाफ, लोकसंदेश न्यूज मीडिया ,सांगली.
9850155823