SANGLI : सांगलीत पत्रकार भवनसाठी जागा आणि निधी तसेच पत्रकारांच्या साठी विमा योजना पत्रकारांच्या साठी घरकुल योजनेसाठी पाठपुरावा केला जाईल :- कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन :

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : सांगलीत पत्रकार भवनसाठी जागा आणि निधी तसेच पत्रकारांच्या साठी विमा योजना पत्रकारांच्या साठी घरकुल योजनेसाठी पाठपुरावा केला जाईल :- कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन :




SANGLI 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगलीत पत्रकार भवनसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल : तसेच पत्रकारांच्या साठी विमा योजना आणि मिरजेतील पत्रकारांच्या साठी घरकुल योजनेसाठी पाठपुरावा केला जाईल :- कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन :

सांगलीत पत्रकारभवन साठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच पत्रकारांच्यासाठी विमा योजना आणि मिरजेतील पत्रकारांच्या साठी घरकुल योजनेसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे यांच्या हस्ते कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री खाडे यांनी पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन दिले.

   प्रत्येक महिन्याला नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी  सांगलीत जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री खाडे यांनी दिली आहे.
            यावेळी अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन यादव, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, जेष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे, कुलदीप माने, शंकर देवकुळे, रॉबिन्सन डेव्हिड, स्वाती चिखलीकर, प्रथमेश गोंधळे, संकेतराज बन्ने, कौसीन मुल्ला यांच्या सह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली