SATARA
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी
उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चोरे गावच्या ग्रामपंचायत पिण्यांच्या पाण्यांची मोटर चोरुन नेणाऱ्या चार संशयित आरोपींच्या उंब्रज पोलिसांनी आवळल्या मुसक्याा... यावेळी उंब्रज पोलिसांनी रात्र गस्ती वेळी आरोपींना रांगेहात पकडले. त्यांच्याकडूंन पोलिसांनी मोटारीसह २,४५,००० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली. त्यांना कराड न्यायालयांत हजर केले असता न्यायालयांने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शुभम धनाजी चव्हाण ( वय १९) ओमकार भाऊसारे खवळे (वय २१) आनंद भाऊसो खवळे ( वय ३० सर्व रा. चोरे ता.कराड) अमोल बबन बाबर ( वय २६ रा. आकाशवाणी झोपडपट्टी शाहूपुरी, सातारा) अशी ताब्यांत घेण्यांत आलेल्या संशयितांची नावे आहेत. चोरे परिसरांत एका कारमधून संशयित व्यक्ती चोरे भागांत फिरत असून ते रात्रीच्या दरम्यान शेतीपंप मोटरी चोऱ्या करीत असतात. अशी माहिती उंब्रज पोलिसांना मिळाली होती, पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता विहिरीवरील मोटर चोरल्यांची कबुली यावेळी आरोपींनी पोलिसांना दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड सहा.पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील ,चालक पोलीस हवा.सचिन देशमुख अभय तावरे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली