SATARA : वाठार येथे पतसंस्था फोडण्यांचा प्रयत्न करीत असणाऱ्या आरोपीच्या वाठार पोलिसांनी आवळल्या मुसक्या....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA : वाठार येथे पतसंस्था फोडण्यांचा प्रयत्न करीत असणाऱ्या आरोपीच्या वाठार पोलिसांनी आवळल्या मुसक्या....



SATARA
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी कोरेगांव

वाठार येथे पतसंस्था फोडण्यांचा प्रयत्न करीत असणाऱ्या आरोपीच्या वाठार पोलिसांनी आवळल्या मुसक्या. वाठार पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक...

वाठार पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्था शाखा वाठार स्टेशन येथे दि. १५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न करीत असताना सदर पतसंस्थेचे सेफ्टी गेट तोडून मुख्य शटर तोडण्यांचा प्रयत्न करीत असताना पतसंस्थेमधील असलेल्या सायरनचा आवाज आल्यांने शेजारीच असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सातारा बँकेचे वाचमेन शुभम सतीश जाधव यांनी तत्काळ वाटर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाईट पेट्रोलिंग कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर व सहा. फौजदार पोलीस नितीन पवार घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. सदर ठिकाणी अंधारातून एक इसम पळून जाण्यांचा प्रयत्न करीत असताना त्यास तेथे असलेल्या वाचमेन शुभम जाधव यांच्या मदतीने पाठलाग करुन संशयितांस वाठार पोलिसांनी ताब्यांत घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी व त्याचे अंगझडती घेतली असता. त्याच्याकडे लहान-मोठे क्र. डायवर एक ड्रिल मशीन, दोन डुबलीकेट चाव्या, दोन एक्स पट्ट्या, १ लोखंडी कटावणी असे घरफोडीचे साहित्य मिळुन आले. त्यांस ताब्यांत घेवुन वाठार पोलीस ठाण्यांत आणून सोपनि या संजय बोंबले यांच्या आदेशावरुन गुन्हा रजि नं २०९/२०२२ भादवि कलम ४५७,३८०,५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्ह्यांचा पुढील तपास सहा. पोलीस फौजदार नितीन पवार करीत आहेत सदर आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी / चोरीचे असे गंभीर स्वरुपांचे गुन्हे दाखल आहेत. सदरचा आरोपी हा अट्टल चोरटा असून वाठार पोलिस व वाचमेन यांच्या सतर्कतेमुळे सदर पतसंस्था फोडण्यांचा प्रकार टाळला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर सहा. फौजदार नितीन पवार आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली