THANE: पत्रकार दिलीप मालवणकर यांना जिवे मारण्याची धमकी....मिडीया व सामाजिक स्तरातून निषेध

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

THANE: पत्रकार दिलीप मालवणकर यांना जिवे मारण्याची धमकी....मिडीया व सामाजिक स्तरातून निषेधTHANE / ULHASNAGAR 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी ठाणे

पत्रकार दिलीप मालवणकर यांना जिवे मारण्याची धमकी......मिडीया व सामाजिक स्तरातून निषेध...
उल्हासनगर येथील ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी ऑडियो क्लिप व्हायरल..
ठाणे जिल्ह्यातील उल्हाससनगर येथिल ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांना एकनाथ शिंदे यांच्या समर्थका कडून जीवे ठार मारण्याची धमकी......

या बाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची भेट घेतली असता विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर येथील जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर हे निर्भिड लिखाण करतात. ते नेहमी सत्याची बाजु घेवुन लिहण्याचे काम करतात. कात्यांनी सत्तधारी शिंदे गटावर आपल्या लिखाणातुन आसुड ओडत असतानाच त्यांचे एक समर्थक राजेश पार्टे याने मालवणकर यांच्या वर खोटे नाटे आरोप करत त्यांना फोन वरुन अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या बाबत दिलीप मालवणकर यानी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसानी या तक्रारीची दखल घेत राजेश पार्टे वर भारतीय दंड विधान संहिता कलम ५०७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.


यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेन्द्र चौधरी, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे, युवा सेना शहर आधिकारी राजेंद्र (बाळा) श्रीखंडे तसेच जेष्ठ पत्रकार रामेश्वर गवई, दैनिक पुण्य विचार चे संपादक किरण पडवळ, लोकसंदेश न्यूजचे ठाणे प्रतिनिधी संभाजी गोसावी , पँथर टाईम चे संपादक कैलास साबळे, छ टिव्ही न्यूज मराठी चे पत्रकार सलीम मन्सूरी, टिव्ही न्यूज मराठी चे पत्रकार जॉनी डेव्हिड, पत्रकार दिपक मोरे, पत्रकार सोनल बिषरे, अन्याय विरोधी संघर्ष समिती चे पदाधिकारी शशिकांत दायमा, पंकज गुरव, कुमार रेडियार यांनी ज्येष्ठ पत्रकार मालवणकर यांना धमकी दिल्याने निषेध व्यक्त केेला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई