नवी दिल्ली : वाहन स्क्रॅप करण्यासाठी पोलिस पडताळणी गरजेची नाही ;केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची माहिती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नवी दिल्ली : वाहन स्क्रॅप करण्यासाठी पोलिस पडताळणी गरजेची नाही ;केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची माहिती
DELHI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :वाहन स्क्रॅप करण्यासाठी पोलिस पडताळणी गरजेची नाही ;केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची माहिती

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गाड्यांशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यानुसार वाहने स्क्रॅप करण्यापूर्वी स्थानिक पोलिसांना वाहनांच्या माहितीची पडताळणी करणे आता गरजेचे नसेल.पूर्वी रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग (आरव्हीएसए) साठी सायबर सेफ्टी सर्टिफिकेशन आवश्यक होते. आता ती अपेक्षा हटवली गेली आहे. नोंदणी नसलेल्या गाड्यांबाबतची प्रक्रिया आता आणखी सुलभ केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. व्यवसाय करण्यात सुलभता यावी, यासाठी ट्रेड सर्टिफिकेट सिस्टीम आणखी सोपी करण्यासाठी नवे नियम अधिसूचित केले आहेत. 
सध्याच्या नियमांमुळे काही अडचणी येत होत्या. त्यात आता केवळ नोंदणी नसलेल्या वाहनांसाठी सर्टिफिकेटची गरज असणार आहे. ट्रेड सर्टिफिकेटसाठी वाहन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो, त्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही.वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी १ एप्रिल २०२२ पासून लागू केली गेली होती. नक्या धोरणांनुसार वाहनांसाठी २० वर्षानंतर फिटनेस टेस्टची तरतूद आहे. तर व्यावसायिक वाहनांसाठी १५ वर्षानंतर फिटनेस टेस्ट करावी लागेल. १५ ते २० वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करावी लागतील.
 एकंदरीत स्क्रॅप पॉलिसीमुळे देशातील रस्त्यांवरून आपोआप हटतील. या पॉलिसीनुसार १५ ते २० वर्षे जुन्या वाहनांना फिटनेस टेस्ट द्यावी लागेल आणि अनफिट असल्यास त्यांची नोंदणी रद्द करून त्यांना स्क्रॅप केले जाईल. व्यावसायिक वाहनांसाठी ही मुदत १५ वर्षे तर खासगी गाड्यांसाठी ही मुदत २० वर्षे इतकी निश्चित केली गेली आहे. त्यानंतर या गाड्या स्क्रॅपमध्ये काढल्या जातील.
_____________________________________________________________

         या बातमीचे प्रायोजक आहेत

 Car Old Parts Co. Pvt.Ltd. Sangli.

       www.caroldpart.com

_____________________________________________________________


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली