💚पहिल्या नॅशनल टुरिझम फेस्टिव्हलमध्ये सांगलीच्या "विठ्ठलाचं झाड"चीच हुकूमत💚

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

💚पहिल्या नॅशनल टुरिझम फेस्टिव्हलमध्ये सांगलीच्या "विठ्ठलाचं झाड"चीच हुकूमत💚
💚पहिल्या नॅशनल टुरिझम फेस्टिव्हलमध्ये सांगलीच्या "विठ्ठलाचं झाड"चीच हुकूमत💚

🌹स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन डॉक्युमेंटरी अवॉर्डने सन्मानित🌹

🌱निसर्गरंग फौंडेशनच्या शाश्वत कामाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक🌱


#स्थळ - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पूणे
#वेळ - सकाळी दहाची
#निमित्त - महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित पहिल्या "नॅशनल टुरिझम शॉर्टफिल्म फेस्टिव्हल" मध्ये आपल्या "विठ्ठलाचं झाड" (The Vitthal Tree) माहितीपटांचं (डॉक्युमेंटरी) ऑफिशियल स्क्रीनिंग....
#प्रेक्षक, परीक्षक म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्थरातील अनेक दिग्गज,कला-पर्यटन क्षेत्रातील नामवंत मंडळी, अभ्यासक, चिकित्सक.... 
@गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शुभदा जोशी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले आणि जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराजराजे भोसले, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर शिवाय; FTII चे माजी अधिष्ठाता अमित त्यागी, निर्माते आदित्य शेठ, चित्रपट अभ्यासक आदित्य अचारी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ,लेखक अक्षय इंडिकर, दिग्दर्शक प्रा. वैशाली केंदळे, एफ टी आयचे आजी-माजी विद्यार्थी... हाऊसफुल्ल..!!!
🙏🎀🙏

मनातील अशांतता अस्थिरतेचे 'शूज' बाहेर काढून अखंड ब्रह्मांडाच्या पोकळीत निर्मळ अंतःकरणाच्या अनवाणी पायाने आत गेलो. अंधारात पापण्यांच्या उघडझाप करीत 
सर्वांच्या नजरा माझ्यावरच स्थिरावल्या होत्या. मोठया पडद्यावर मलाच पाहत होते. 'विठ्ठलाचे झाड' अनुभवत होते.

..... इतक्या मोठ्या आणि असंख्य दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय,पुणे इथं स्क्रिनिंग होणं हेच मोठं अवॉर्ड होतं.


अधून मधून प्रेक्षकांचा डोळस भावनिक प्रतिसाद त्या तल्लीन अंधारातही आम्हाला 'उजेड' देत होता. 'निसर्गराया भेटूया । चला,विठ्ठल पेरूया ।।" ही संकल्पना जगभरात पोहचवीत होता. आता वेगवेगळ्या भाषेच्या, प्रांतांतील डॉक्युमेंटरी पाहून आम्हीही नवं शिकत होतो; तृप्त होत होतो.

..... मनसोक्त आनंद घेतल्यानंतर जेंव्हा ज्युरी (परीक्षक) यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वाधिक वेळ 'विठ्ठलाच झाड' या डॉक्युमेंटरीसाठी दिला; तेंव्हा तब्बल सहा वर्षे करीत असलेल्या 'निसर्ग प्रवासाचे - त्यातील अनुभूतींचे' सार्थक होत असल्याचे स्पष्ट भाव ज्युरींच्या आवाजात जाणवत होते. हे सुद्धा अवॉर्डच म्हणावे लागेल.
..... त्यातही 'विठ्ठलाच झाड' स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन डॉक्युमेंटरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आल्यानंतर अभिमानाने ऊर भरून आला. कार्यक्रमानंतर मीडियाने दिलेला प्रतिसाद, अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून दिलेली कौतुकाची थाप, मनाच्या अबोल कप्प्यात प्रचंड ऊर्जेचा स्रोत म्हणून पुढील काळात अखंड प्रेरणा देईल;हे निश्चित...

या आनंदी दिवसाचे,सुंदर डॉक्युमेंटरीचे संपूर्ण श्रेय...
सन्मानीय मारुती शिरतोडे यांचे  कर्तृत्ववान सुपुत्र मा. विशाल आणि मा. विक्रम तसेच; निसर्गरंग फौंडेशन'च्या प्रत्येक निसर्गसोबतीचे,संमित्राचे आहे.

🙏मनापासून धन्यवाद🙏
निसर्गरंग फौंडेशन
आणि रोडमॅप एंटरटेनमेंट

💝!..लेखणीपुत्र💝

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_________________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीच्या सर्व परताव्याची लेखी हमी... त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           www.nisargbhumi.com


_________________________________________________________________