KOLHAPUR : नविद मुश्रीफ यांची आजरा तालुक्यातील सोहाळे गावाला भेट....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : नविद मुश्रीफ यांची आजरा तालुक्यातील सोहाळे गावाला भेट....
KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

नविद मुश्रीफ यांची आजरा तालुक्यातील सोहाळे गावाला भेट....            राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व व गोकुळचे संचालक मा. श्री.नविद मुश्रीफ साहेब यांनी आज सोहाळे (ता.आजरा) येथील समता ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. श्रींचे आशीर्वाद घेतले. गावातील विविध समस्येबाबत चर्चा करून ती सोडवण्याचे आश्वासन दिले.

          गावचे सुपुत्र श्री.मारुती डेळेकर यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. आमदार मा. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी गावातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मुश्रीफ यांचे ऋण व्यक्त केले. त्यांचे हे उपकार सोहाळे ग्रामस्थ विसरणार नाहीत असे आश्वासन देण्यात आले.           यावेळी अण्णा पाटील, बाबुराव दोरुगडे, सुधीर सावंत, चंद्रकांत कोंडुसकर, तुकाराम देसाई, महादेव पाटील, सुनिल कोंडुसकर, सचिन कळेकर उपस्थित होते. वसंत कोंडुसकर यांनी आभार मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,

सांगली