KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
हातकणंगले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी प्रमुख सपकाळ यांची निवड
कुंभोज ता हातकणगले येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रमोद सपकाळ यांचे कार्य उल्लेखनीय असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुंभोज येथे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव व संजय पाटील यांनी त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.
सदर निवडीची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांनी केली असून लवकरच कोल्हापूर येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत त्यांना सदर निवडीचे पत्र देण्यात येणार आहे.प्रमोद सपकाळ त्यांच्या या निवडीने कुंभोज परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा ताकद मिळाली असून. त्यांच्या या निवडीबद्दल वारणा दूध संघाचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, कुंभोज ग्रामपंचायत सदस्य विशाखा माळी, अमोल गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सपकाळ, दुर्गेवाडी ग्रामपंचायत सरपंच सचिन घोलप, सचिन शिंदे,राहुल कत्ते,निवास माने, संभाजी सपकाळ, तसेच कुंभोज शहर पत्रकार संघटनेच्या वतीने प्रमोद सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला.
परिणामी पक्षाने आपल्याला दिलेल्या जबाबदारी आपण शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पार पडणार असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे मत यावेळी नूतन तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ यांनी बोलताना व्यक्त केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली