KOLHAPUR : इचलकरंजी फेस्टीवल अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धेत चेतन शिंदे याचे यश मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून आले गौरविण्यात...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : इचलकरंजी फेस्टीवल अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धेत चेतन शिंदे याचे यश मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून आले गौरविण्यात...KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे

इचलकरंजी फेस्टीवल अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धेत चेतन शिंदे याचे यश मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून आले गौरविण्यात...


इचलकरंजी फेस्टीवल अंतर्गत घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत ५० किलो वजनी गटामध्ये जिम्नॅशियम जिमचा व्यायामपटू केतन विलास शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला.त्याला जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे , ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले.इचलकरंजी येथे गणेशोत्सवानिमित्त फेस्टीवल अंतर्गत विविध स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यंदाच्या वर्षी सोमवारी
घोरपडे नाट्यगृहात या इचलकरंजी फेस्टीवलचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेने करण्यात आला.यावेळी विविध गटांमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये विविध ठिकाणाहून व्यायामपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ५० किलो वजनी गटामध्ये जिम्नॅशियम जिमचा व्यायामपटू केतन विलास शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे 
ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते त्याला बक्षीस देवून गौरविण्यात आले.
यावेळी स्वप्निल आवाडे ,सौ.मोश्मी आवाडे ,प्रा.शेखर शहा ,अजिंक्य रेडेकर , राहुल घाट ,तात्यासो कुंभोजे , सचिन गोलंगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी , खेळाडू व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विजेत्या चेतन शिंदे याला जिम्नॅशियमचे जिमचे प्रशिक्षक प्रवीण धुमाळ, वडील विलास शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.याबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली