LOKSANDESH VISHESH: कमवा व शिका हा नारा देणारे महान समाज सुधारक - कर्मवीर भाऊराव पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

LOKSANDESH VISHESH: कमवा व शिका हा नारा देणारे महान समाज सुधारक - कर्मवीर भाऊराव पाटील




LOKSANDESH VISHESH: 

कमवा व शिका हा नारा देणारे महान समाज सुधारक - कर्मवीर भाऊराव पाटील

           (22 सप्टेंबर, जयंती विशेष लेख)

भाऊरावांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी झाला.19 वे शतक म्हणजे अनेक समाज सुधारकांचा संघर्षाचा काळ होय त्या पैकी एक नाव म्हणजे भाऊराव पाटील. तस पाहिलं तर भाऊराव यांचं मूळ कर्नाटक मधील मुदबिद्री हे होय.परंतु भाऊरावांचे पूर्वज हे महाराष्ट्रात स्थलांतरीत झाल्यामुळे भाऊरावांच संघर्षशील आयुष्य हे महाराष्ट्रातच गेलं. वडील पायगोंडा व मातोश्री भंगूबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या भाऊरावांना फक्त सहावी पर्यन्तच शिक्षण घेता आलं. परंतु सहावी पर्यन्तच शिक्षण घेऊन समाजापुढे मोठा आदर्श निर्माण करून भाऊराव पाटील हेच एका अभ्यासाचा विषय बनले आहेत.



छत्रपती शाहू महाराज,छत्रपती सयाजी महाराज गायकवाड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व महामानव महात्मा फुलेंच्या विचाराने प्रेरित झालेले होते. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती सयाजी महाराज गायकवाड यांनी शिक्षणा साठी अनेकांना आर्थिक मदत केलेली आपण सर्वांनी ऐकले किंवा वाचलेच आहे. परंतु भाऊराव पाटील यांनी देखील ज्ञानदेव घोलप नावाच्या अस्पृश्य विध्यार्थ्यास शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती. पुढे तोच विध्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक या वृत्तपत्रासाठी काम करू लागला.
कर्मवीर भाऊरावांच्या आयुष्यातला एक प्रसंग असा होता. भाऊराव पाटील  विध्यार्थी दसेत वस्तीगृहात राहत  असताना एका अस्पृश्यांसाठीच्या वस्तीगृहाच्या उदघाटनासाठी गेले होते उदघाटन करून वापस आल्यावर त्यांच्या वस्तीगृहाच्या व्यवस्थापकाने त्यांना स्नान करण्यास सांगितले परंतु भाऊरावांनी व्यवस्थापकाचा आदेश पाळला नाही. आदेशाचे पालन न केल्यामुळे भाऊरावांना वस्तीगृहामधून काढण्यात आले. वस्तीगृहातुन काढल्यामुळे भाऊरावांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली नंतर शाहू महाराजांनी भाऊरावांना विध्यार्थी कक्षातच राहण्याची सोय केली.यावरून भाऊराव हे अस्पृश्यतेच्या विरोधात होते हे लक्षात येते.



    विध्यार्थी दशेत असताना विध्यार्थ्यांच्या समस्या काय असतात हे भाऊरावांनी जानलं होतं म्हणून शिक्षण सोडल्यानंतर भाऊरावांनी 1909 रोजी विदयार्थ्यांसाठी एक आश्रम सुरु केला ज्याला दूधगाव विध्यार्थी आश्रम म्हणून ओळखले जाते. अस्पृश्यतेचा विचार न करता भाऊरावांनी महार - मांग अश्या सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांसाठी आश्रम सुरु केला.भाऊरावांचे शैक्षणिक परिवर्तनाचे काम पुढे हि चालूच राहिले. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील कार्ले या ठिकाणी सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. या परिषदेत भाऊराव पाटील यांनी हि सहभाग घेतला होता. या परिषदेत बोलत असताना भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापण्याची सूचना केली होती व त्यात गोर गरीब पिडीत वंचित अस्पृश्य व बहुजन समाजातील सर्वच विध्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्याचा विचार मांडला होता. याच विचारातुन 4 ऑक्टोबर 1919 रोजी कार्ले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.जी आजही कार्यरत आहे.


   अस्पृश्यता निवारण करत असताना 1924 मध्ये भाऊराव पाटील यांनी एक वसतिगृह स्थापन केले होते त्या वस्तीगृहामध्ये मोहिते आडनाव असलेल्या अस्पृश्य व्यक्तीला ठेवून अस्पृश्यतेच्या विरोधात एक प्रकारे त्यांनी चळवळच उभी केली होती. कालांतराने त्याच वस्तीगृहाचे नाव श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे केले होते.यावरून छत्रपती शाहू महाराजांप्रति असलेला त्यांचा आदर दिसून येतो.याच शाहू बोर्डिंग ला छत्रपती सयाजी महाराज गायकवाड यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली होती.



   आर्थिक परिस्थितीमुळे बहुजनांच्या विध्यार्थ्यांना शिक्षण घेणं शक्य होत नव्हतं.उपजीविका भगवण्यासाठी शिक्षणापेक्षा काम करण भाग पडत असल्यामुळे भाऊराव पाटलांनी बहुजनांच्या विध्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा क्रांतिकारक नारा देऊन शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. यावरून बहुजनांसाठी शिक्षण किती महत्वाच होतं हे लक्षात येतं.भाऊराव पाटलांनी साताऱ्या मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय नावाने देखील एक कॉलेज सुरु केले होते. यावरून महात्मा फुलें बद्दल भाऊरावांना किती आदर होता हे लक्षात येते. अश्या या महान समाज सुधारकास जयंती दिनी समस्त बहुजन बांधवांच्या वतीने विनम्र अभिवादन व समस्त बहुजन बांधवांस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या शुभेच्छा.

-----------------------------------------------------------------------------------------
साभार :- परमेश्वर बनकर, बीड - 9503288282
-----------------------------------------------------------------------------------------

            या बातमीचे प्रायोजक आहेत
            सेंचुरी मार्केट कमिटी, सांगली.

           www.CenturyMarket.in

      सांगलीतील अकराशे सात दुकाने नोंद असलेली 
                  अग्रगण्य सामाजिक संस्था
___________________________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली