RAYGAD: कोलाड-रोहा मार्गावर आपघात इर्टिगा कार दुचाकी स्वारावर धडकली, तीन जण गंभीर जखमी उपचारासाठी मुबंईला हलविले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RAYGAD: कोलाड-रोहा मार्गावर आपघात इर्टिगा कार दुचाकी स्वारावर धडकली, तीन जण गंभीर जखमी उपचारासाठी मुबंईला हलविलेRAYGAD: 
लोकसंदेश न्यूज श्याम लोखंडे 

कोलाड-रोहा मार्गावर आपघात इर्टिगा कार दुचाकी स्वारावर धडकली, तीन जण गंभीर जखमी उपचारासाठी मुबंईला हलविले

कोलाड रोहा मार्गावर मोठा आपघात भरधाव इर्टीगा कार दुचाकी स्वरावर धडकली तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मुबंईकडे हलविण्यात आले आहे तर वाहनांचा खूप नुकसान झाले आहे .

कोलाड रोहा मार्गावरील पाले बु .हद्दीतील स्मशान भूमिसमोर बुधवार दि.३१ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास इर्टिगा कार क्र.एम एच ०६ सीडी १६१२ही कार रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता विरुद्ध साईडला जोरदार वेगाने जात असताना रोहा बाजूकडील येणारी पॅशन प्रो.मोटार सायकल क्र.एम एच ४७/एम ४८८१ हिला समोरून धडक दिल्याने यातील मोटार चालकस्वार व त्याचे दोन साथीदार यांना गंभीर दुखापत झाली असून सदर दुखापतग्रस्थांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या विषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की,
 कोलाड कडून रोहा कडे जाणाऱ्या दिपक दत्तात्रय नाईक आदर्शनगर,भुनेश्वरनगर, रोहा यांच्या ताब्यातील इर्टिगा कार हिने रॉंग साईडला जाऊन रोहा कडून येणाऱ्या मोटार सायकलला धडक दिल्याने या अपघातात नरेश यशवंत कडव (वय ३६),गणेश गोविंद कडव (वय ३८), विनोद सखाराम दहिंबेकर (वय ४०)हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून अधिक तपास कोलाड पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री फडतरे व आर आर राऊळ करीत आहेत .

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,

सांगली