Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI; नागरिक जागृती मंच, सांगली यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे....



SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

नागरिक जागृती मंच, सांगली यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे....


सांगली सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी सिविल हॉस्पिटलची दैना झालेली आहे... प्रत्येक राजकारणी व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी सिव्हिल मध्ये फक्त बातमीसाठीच जाऊन येतो ..



त्याच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही . त्यामुळे नागरिक जागृती मंच आता रस्त्यावर उतरलेली आहे ... सांगली सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सिव्हिल हॉस्पिटलचे परिस्थितीमध्ये काहीही फरक झालेला नाही.


हा फक्त इमारतीचा सांगाडा राहू नये अशा आशयाचे पत्र संघटनेचे प्रमुख सतीश साखळकर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे


_________________________________________________

मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
विषय- मिरज येथे १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय याचे बांधकाम सांगली शासकीय हॉस्पिटल किंवा मिरज शासकीय हॉस्पिटल येथील आवारात होणेबाबत,
महोदय,
सांगली येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय बांधकामास उच्चाधिकार सचिव समितीने दिनांक ०४ मार्च २०२१ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली होती. उच्चाधिकारी सचिव समिती यांचे शिफारीनुसार सदर रुग्णालय सांगली ऐवजी मिरज येथे स्थलांतरण करणेबाबत दिनांक २९ /११ / २०२१ निर्णय झाला आहे. आमच्या माहितीनुसार सदर इमारत हि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या जागेमध्ये करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु सदर जागेमध्ये हे हॉस्पिटल झालेस यामध्ये डॉक्टर व इतर कर्मचारी सहजतेने उपलब्ध होण्यासाठी खुप अडचणी निर्माण होणार आहेत किंवा अशक्य प्राय गोष्ट आहे. तसेच अन्य सोई सुविधां हि मिळणार नाहीत. त्यामुळे नागरिकांची व रुग्णाची खुप गैरसोय होणार आहे. त्याऐवजी सदर हॉस्पिटल सांगली शासकीय रुग्णालय अथवा मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात झाल्यास याच शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी सहजतेने उपलब्ध होतील तसेच अन्य सोई सुविधाची हि
उपलब्धता निर्माण होईल व नागरिकाचे व रुणाची सोई होईल. सदर रुग्णालयाच्या बाबतीत आम्हाला सांगली व मिरज असा वाद करायचा नाही. सदर रुग्णालय हे रुग्णाच्या व नागरिकांच्या सोईसाठी व्हावे अन्यथा हे रुग्णालय फक्त इमारतीचा सांगाडा होऊ नये नाही तर हे सुद्धा एक दिवा स्वप्नच ठरेल.
यासाठीच्या माहितीसाठीच्या प्रती पुढील प्रमाणे लोकप्रतिनिधीना शासकीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत 
१)मा. आमदार सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री, महराष्ट्र राज्य २)मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ ३)मा. जिल्हाधिकारी, सांगली ४)मा शल्यचिकीत्सक, सांगली जिल्हा.४) नागरिकांच्या माहितीसाठी प्रसारित...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली