SANGLI:मराठीत एक म्हण आहे ``काम नाही घरी सांडून भरी" असा काहीसा प्रकार आता सांगली महापालिकेत सुरू आहे....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI:मराठीत एक म्हण आहे ``काम नाही घरी सांडून भरी" असा काहीसा प्रकार आता सांगली महापालिकेत सुरू आहे....



SANGLI 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

मराठीत एक म्हण आहे " काम नाही घरी सांडून भरी" असा काहीसा प्रकार आता सांगली महापालिकेत सुरू आहे....


आयुक्तांकडून आरोग्य अधिकाऱ्याची कानउघाडणी


 सांगली व्यवसाय परवाना नसल्याच्या कारणावरून महापालिकेने गणपती पेठेतील दोन दुकानांना टाळे होता. ठोकले होते. आयुक्तांच्या आदेशाविनाच ही कारवाई करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी बुधवारी आयुक्त सुनील पवार यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांची कानउघाडणी केली. तसेच दोन्ही दुकानांचे टाळे काढण्याचे आदेश दिले. दरम्यान, विनाकारण व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या आंबोळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी आयुक्तांकडे केली.


शहरातील गणपती पेठ येथील दोन दुकानांना डॉ. आंबोळे व पथकाने मंगळवारी टाळे ठोकले होते. लोकशाही दिनामध्ये तक्रार आल्यानंतर आयुक्त पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात केलीआल्याचे त्यांनी सांगितले होते. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी निषेध केला


'बुधवारी शहा यांच्यासह व्यापाऱ्यांनी आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते विनायक सिंहासने, नगरसेवक मयूर पाटील उपस्थित होते. कोणाच्या आदेशावरून दुकानांना टाळे ठोकले असा सवाल सभापती सूर्यवंशी व सभागृह नेते सिंहासने यांनी डॉ. आंबोळे यांना केला. यावर डॉ. आंबोळे निरुत्तर झाले. . आयुक्तांनी आदेश दिला नसल्याचे सांगत आंबोळेंची कानउघाडणी केली.

सूर्यवंशी व सिंहासने यांनीही डॉ. आंबोळे यांना धारेवर धरले. त्यांची चौकशी करावी. त्यांनी उर्मट भाषा वापरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे
________________________________________
_

https://www.loksandeshnews.com/2022/08/sangli_7.html?m=1

*सांगली ग्रामपंचायत उर्फ सांगली महानगरपालिका प्रशासन डोक्यावर पडलय...*

__________________________________________

आम्ही सेंचुरी मार्केट कमिटीचे अध्यक्ष (ज्यांच्याकडे अकराशे सात दुकान गाड्यांची नोंद असलेली संस्था) असलेली संस्था आयुक्त साहेब, आपणास विनंतीपूर्वक आमचे म्हणणे मांडतो की,सांगली महानगरपालिकेमध्ये आम्हा दुकानदारा विषयी सर्व सांगलीत त्रास देण्याचे काम महापालिका व आरोग्य खात करतच असते... कचरा टाकला प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या. . अशा अनेक कारणे देऊन त्यांच्यावर कोणते ना कोणत्या प्रकारे  कारवाई करून आम्ही किती काम करतो याची "चमकोगिरी" करण्यात ही अधिकारी मग्न असतात , हाच स्टाफ जर कुत्री, भटके जनावरे, गटारी साफ करणे, यादी कामासाठी, सांगलीच्या ज्या खरोखरच्या यातना व प्रश्न आहेत याच्यावर लावला तर सांगलीकरांना काहीतरी दिलासा मिळेल , पण अस होण नाही....सांगली महापालिकेमध्ये "कोणाचा पायपुस कोणाच्या पायात राहिलेला नाही"  "हम करे सो कायदा" अशा प्रकारे सांगली महापालिकेचे काम सुरू आहे . .वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसे गुंडाळता येते याचं ट्रेनिंगच या  खालच्या अधिकार्या नी घेतल्यामुळ त्यांना कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा धाक अथवा दरारा राहिलेला नाही, आम्ही नवनिर्वाचित आयुक्त सुनील पवार यांना सुचऊ इच्छितो की, आपण महापालिकेतील दोन चार अधिकारी  निलंबित केल्यानंतर किंवा त्यांच्या बदल्या चंद्रपूर मध्ये केल्यानंतर ह्या लोकांवर आपला वचक राहील, काय झालंय वर्षानुवर्ष हे अधिकारी सांगलीमध्ये तळ ठोकून आहेत त्यामुळे सर्व प्रकारचे लागेबांधे निर्माण झालेले आहेत त्यासाठी सांगलीकरांनाही लागलेली ही कीड अशीच राहणार आहे. . आपण आयुक्त म्हणून याल आणि जाल परंतु ही कीड अशीच कायम राहणार आहे ...याची कृपया आपण नोंद घ्यावी  ...सर्व सांगलीमध्ये या अधिकाऱ्यांनी उत्माद मांडलेला आहे. .. आम्हाला असं कळतंय की ,आंबोळे साहेबांचा पगार आयुक्ता पेक्षा जास्त आहे, आणि ते आता रिटायरमेंट मध्ये पण आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आता काम करायची गरज नाही.   परंतु आता काहीतरी काम करून दाखवायचं म्हणून "चमकोगिरी"त्यांनी केली असावी असो...
सांगली महानगरपालिकेमध्ये जसे नगर विकास, वॉटरवर्स, घरपट्टी विभाग, व ईतर सर्व विभागांमध्ये खाबुगिरीने बरबटलेल आहे.   ..आयुक्त साहेब, आपल्यावर सांगलीकरांच्या बरेच बऱ्याच अपेक्षा आहेत, आणि त्या आपण योग्य रीतीने पार पाडाल अस आम्हास वाटते....

https://www.loksandeshnews.com/2022/07/blog-post_86.html?m=1

 सांगलीला मध्ये मागे आम्ही लिहिलं होतं तसं "सांगली ग्रामपंचायत करा" याच्या मागचा उद्देशच असा होता की. .. सांगली महापालिका ही अधिकाऱ्यांनी चालवायच्या लायकीचीच राहिलेली नाही. .  त्याला एखादा ग्रामसेवक सुद्धा चालू शकतो   ..अशी जर पद्धत राहिली तर ग्रामसेवक सुद्धा चालू शकतो ..  आम्ही बातमी आणि लेख लिहिला होता... परंतु आपण वरिष्ठ अधिकारी म्हणून लक्ष घालून सांगलीकरांना न्याय द्यावा.  ..  असं सेंचूरी मार्केट व सांगली लोखंड मार्केटचा अध्यक्ष म्हणून मी आपणाकडे मागणी करत आहे,

सलीमभाई नदाफ ;
अध्यक्ष ; सांगली सेंचुरी मार्केट कमिटी,100 फुटी रोड सांगली,(1107 दुकाने नोंदणी)
सांगली लोखंड मार्केट,कोल्हापूर रोड, सांगली, (170 दुकाने नोंदणी )
व संपादक :लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
८८३०२४७८८६
________________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली