SANGLI कर्मवीरांनी महाराष्ट्र शंभर वर्षे पुढे नेला..अण्णांना भारतरत्न द्या. प्रा. एन.डी.बिरनाळे यांचे प्रतिपादन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI कर्मवीरांनी महाराष्ट्र शंभर वर्षे पुढे नेला..अण्णांना भारतरत्न द्या. प्रा. एन.डी.बिरनाळे यांचे प्रतिपादनSANGLI 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

कर्मवीरांनी महाराष्ट्र शंभर वर्षे पुढे नेला..अण्णांना भारतरत्न द्या. प्रा. एन.डी.बिरनाळे यांचे प्रतिपादन...

ऐतवडे बुद्रुक येथे विद्यार्थी व विधवांच्या सन्मानाने कर्मवीरांची १३५ वी जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी..

सांगली दि. २२ : अठरा विश्वे दारिद्र्य आणि विषमतेच्या गर्तेत सापडलेल्या वंचित बहुजन समाजाला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाईंनी ताकद दिली. कमवा आणि शिका योजनेतून स्वाभिमानी व स्वावलंबी पिढ्या घडविल्या. रयत शिक्षण संस्थेत बारा बलुतेदार.. अठरा पगड जातीची मुलं शिकली.. वसतिगृहात समतेचे धडे घेतले.. अशा समाजाला शिक्षणाची कवाडे खुली करुन त्यांना आर्थिक.. सामाजिक स्वातंत्र्य बहाल केले. भारतीय संविधानाचा सर्वात मोठा सन्मान कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी केला व महाराष्ट्र शंभर वर्षे पुढे नेला म्हणून ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात अण्णांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर व्याख्याते प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. ऐतवडे बुद्रुक येथे ग्रामस्थ व सन्मती संस्कार मंचच्या वतीने कर्मवीर अण्णांच्या १३५ व्या जयंती कार्यक्रमात आयोजित विद्यार्थी व विधवा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले होते.प्रारंभी दिपप्रज्वलन झाल्यावर स्वागत प्रास्ताविक प्रा. वर्धमान बुद्रुक यांनी केले. यावेळी
मार्च २०२२ च्या बोर्ड परिक्षेत उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर विधवा महिलांचा सत्कार संपन्न झाला.
प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले,कर्मवीर भाऊराव अण्णांच्या यांच्या रयत स्थापनेमागे भ. महावीरांचे जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञानच मूळ प्रेरणा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग हा अण्णांच्या रयत शिक्षण संस्था व ऐतवडे बुद्रुक गावातून जातो. या गावात कर्मवीर शिक्षण संकुल निर्माण करून त्याठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करावेत. कर्मवीर जीवन दर्शन दालन उभारावे.. शासनाने कर्मवीर ग्रामीण विकास विद्यापीठ स्थापन करावे.. अलिकडे विधवा सन्मानाचे अनेक ठिकाणी ठराव होत आहेत परंतु सन्मती संस्कार मंच गेल्या पंधरा वर्षांपासून विधवांचा जाहीर सत्कार करुन त्यांना घरात.. समाजात प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी प्रबोधन करत आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान करीत आहे. हे खरे कर्मवीर अण्णांना अभिवादन होय.सन्मती संस्कार मंचचे स्वच्छता, आरोग्य, रक्तदान, वृक्षारोपण,विधवा व जेष्ठ नागरिक सत्कार, गुणवंतांना पुरस्कार.. दिव्यांगाना मदत, संस्कार.. शिक्षण.. इ. उपक्रम हे कर्मवीर विचारच आहेत.अध्यक्षीय भाषणात सुरेश चौगुले यांनी सन्मतीच्या उपक्रमामुळे समाज परिवर्तन होत असून हजारोंच्या संख्येने समाज यामध्ये सहभागी होत आहे. मानवतावादी राष्ट्रीय भान ठेवून कामे सुरु आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र मोठा झाला आहे. मुलांना शिकवा.. सद्वर्तनी व्हा.. अण्णा हे महाराष्ट्राचे खरे दैवत होय. '


सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी तर आभार संघटक सुनिल पाटील पत्रकार यांनी मानले. कर्मवीर अण्णांच्या जीवन कार्यावर मुलांची भाषणे लक्षवेधी ठरली.
यावेळी सन्मती चे कारंदवाडीचे संघटक संजय पाटील, दिपक पाटील, सुदर्शन खोत, अभय आवटी, प्रा. वर्धमान बुद्रुक, प्रदीप पाटील, भ. शांतिनाथ मंदीर कमिटी अध्यक्ष शांतिनाथ पाटील, जितेंद्र पाटील, अशोक पाटील डी. एम. पाटील सर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस. ए. पाटील,ह. भ. प. विजय खटावकर, श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली