SANGLI: सांगली पोलीस मुख्यालय येथे ३६ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडास्पर्धा २०२२ च्या उत्सवात संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: सांगली पोलीस मुख्यालय येथे ३६ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडास्पर्धा २०२२ च्या उत्सवात संपन्न



SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

सांगली पोलीस मुख्यालय येथे ३६ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडास्पर्धा २०२२ च्या उत्सवात संपन्न


सांगली पोलीस मुख्यालय येथे दिनांक २८.९.२०२२ ते ३०.९.२०२२ पर्यंत ३६ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडास्पर्धा २०२२ च्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेस सांगली विभाग, मिरज विभाग जत विभाग, तासगाव विभाग, विटा विभाग, इस्लामपुर विभाग, पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता.


 यामध्ये १५० पुरुष खेळाडु व ५० महीला खेळाडू असे एकून २०० पुरुष, महीला खेळाडुनी सहभागी झाले होते. या स्पर्धा अॅथलेटिक्स, कबड्डी,
 

जलतरण, बॉक्सींग, कुस्ती, ज्युदो, व्हॉलीबॉल, खो-खो, फुटबॉल, हॉकी, वेटलिप्टींग, तायक्वादो, हॅण्डबॉल अशा वेगवगळ्या एकुण १४ खेळ प्रकारामध्ये पारर्शकरित्या पार पडल्या आहेत.




या क्रिडा स्पर्धेतील विजते सर्व खेळाडु, पुरुष व महीला यांना प्रमुख पाहुणे मा. श्री अजेय श्रीधर राजदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली, मा.श्री.आर. के. मलावादी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग १ मा. पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले मॅडम, याचे हस्ते ट्राफी व प्रशस्ती पत्र देवून त्याचा गौरव करण्यात आला.



 व या क्रिडा स्पर्धेतील सर्व विजते खेळाडु, पुरुष व महीला यांना प्रमुख पाहुणे मा. श्री. अजेय श्रीधर राजदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली यांनी यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०१२ मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडु पोलीस नाईक अविनाश लाड



तर सर्वोत्कृष्ठ महीला खेळाडू महीला पोलीस शिपाई सीमा यादव यांनी हा बहुमान मिळवला. 



सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२२ च्या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण पुरुष विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे. सर्वसाधारण महीला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे. सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०२३ चा पुढील स्पर्धा घेण्याचा बहुमान राखीव पोलीस निरीक्षक पांडुरग सुर्यवंशी पोलीस मुख्यालय यांना प्रमुख पाहुणे मा. श्री. अजेय श्रीधर राजदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली व मा. श्री. आर. के. मलाबादी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग १ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.



या बक्षीय समारंभ कार्यक्रमास मा. पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके सांगली विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर मिरज विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शेंडगे तासगाव विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले जत विभाग, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सुर्यवंशी राखीव पोलीस उपनिरीक्षक मणिलाल पवार, विजय पानपाटील, स्पोर्टस इनचार्ज स्वनील सावंत, रवि कांबळे, विवेक सांळुखे रविद्र पाटील, अभिजीत फडतरे, राकेश पांढरे, विविध खेळप्रकारातील पंच व खेळाडू उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने नागरीक व विदयार्थी हजर होते.


         सौजन्य :
सतिश शिंदे पोलीस निरीक्षक,
       स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_________________________________________________________

 या बातमीचे प्रायोजक आहेत ...

सेंचुरी मार्केट कमिटी सांगली, 1107  दुकाने नोंद  असलेली अग्रगण्य संस्था... 

            www.centurymarket.in

_________________________________________________________