SANGLI : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
SANGLI 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २०२२-२३ या शैक्षणीक वर्षात आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी व संबंधित शैक्षणीक संस्थांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत असे आवाहन सांगली जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त खुशाल गायकवाड यांनी केले आहे.


 
सीईटी, जेईई, नीट, गेट, नाटा तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयात अर्ज दाखल केलेले नाहीत अशा विद्याथ्यांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तात्काळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्याची एक प्रत दि. १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली या कार्यालयाकडे सादर करावी.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,

सांगली