Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

YAVATMAL श्री हॉस्पिटल उमरखेड डॉक्टर नव्हे देवदूतच.. डॉ विवेक पत्रे आणि टीमचे होप संस्थेचे अध्यक्ष डॉ, अविनाश खंदारे यांनी केले जाहीर अभिनंदनYAVATMAL
लोकसंदेश प्रतिनिधी: मनोज राहुलवाड,ढाणकी.यवतमाळ 

श्री हॉस्पिटल उमरखेड डॉक्टर नव्हे देवदूतच..
डॉ विवेक पत्रे आणि टीमचे होप संस्थेचे अध्यक्ष डॉ, अविनाश खंदारे यांनी केले जाहीर अभिनंदन    आजही डॉक्‍टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्‍टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. 


 डॉ,अविनाश खंदारे यांचे पुसद येथील जिवलग मित्र आदर्श शिक्षक चंन्द्रकांत ठेंगे यांचे  काका , दत्तराव ठेंगे, उमरखेड येथे राहतात. सकाळी फिरून आल्यावर शरीराचा एक भाग बधिर झाला. ताबडतोब उमरखेड येथील डॉ विवेक पत्रे यांचेकडे त्यांना नेण्यात आले.दोन्ही मुले बाहेरगावी, एक देशसेवेसाठी पटीयाला येथे आहेत,
अश्या परिस्थितीत योग्य उपचार करण्याची शाश्वती देऊन त्यांनी उपचार सुरू केले आणि चोवीस तासात त्यांचा बधिर झालेले शरीर पूर्वरत काम करू लागले.
 5 वर्षापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. मागील 5 वर्षापासून Cap.Ecosprin AV (150/20) चालू असून सुद्धा  दि. 22/09/2022 रोजी अर्घांग वायूचा (Paralysis) आजार झाला त्यांचेवर श्री श्री हॉस्पिटल उमरखेड येथे अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर करून यशस्वी उपचार करण्यात आला. शरीराची डावी बाजू (एक हात व एक पाय) पुर्ण हालचाल कमी झाली असताना त्या रुग्णाला काही नवीन औषधी  (Thrombolysis) वापरून उपचार केले 
व 24 तासच्या एकदम ठणठणीत व आर्घांग वायू सारख्या घातक आजारापासून मुक्त झाले. जर अर्धांगवायू झाल्यापासून 3 तासाच्या आत रुग्णाला हॉस्पिटलला आणल्यास त्याच्यावर निश्चितच खात्रीशीर ईलाज होऊ शकतो. असे डॉ विवेक पत्रे यांनी सांगितले.
 खरोखरच ही अत्याधुनिक उपचार पद्धती आणि सी टी स्कॅन सुविधा उमरखेड सारख्या गावात सुरू झाल्यामुळे अर्धांगवायू रुग्णासाठी जिवन संजीवनीच म्हणावी लागेल.डॉ  खंदारे यांच्या वतिने. डॉ विवेक पत्रे व त्याची टीम   डॉ अजित नलावडे अक्षय वाघमारे ओम पवार व नर्सीग या सर्व टीम चे पुष्पगुच्छ देऊन होप संस्थेचे अध्यक्ष डॉ, अविनाश खंदारे यांनी अभिनंदन केले


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली