आपल्या दिवाळीमध्ये गोरगरिबांची पण दिवाळी व्हावी असा एक पांयडा पाडण्यास काय हरकत आहे.... आपण हा सण सर्वजण आनंदात करत असतो.... हा आनंदाचा सण गोरगरिबांच्या पर्यंत सुद्धा त्यांचं कुटुंब त्यांचे पण संसार आनंदी व्हावा या उद्देशाने हा लेख

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आपल्या दिवाळीमध्ये गोरगरिबांची पण दिवाळी व्हावी असा एक पांयडा पाडण्यास काय हरकत आहे.... आपण हा सण सर्वजण आनंदात करत असतो.... हा आनंदाचा सण गोरगरिबांच्या पर्यंत सुद्धा त्यांचं कुटुंब त्यांचे पण संसार आनंदी व्हावा या उद्देशाने हा लेख




               मनुष्य इंगळी.... अति दारूण.

“पणत्या कशा दिल्या काकू?”

*“नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन”*

*“मला ६ हव्यात.”*

*“६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी..”*

*हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.*


*लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहित धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.*


*“हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या.” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “हवेत कशाला ढीगभर कपडे?” असं म्हणावं. जमेल का?*


*एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.*

*मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.*


*एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.*

*“केवढ्याला दिली रे?”*

*“साठ रूपये साहेब.”*

*“साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस?”*

*“खेळणंच आहे.”*

*“साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीस ला दे.”*

*“साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीस ला कशी देऊ?”*

*तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे.”*

*“चल. देतो तुला प्ले स्टेशन.”*

*बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट.” असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.*

*“दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही.” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.*

*डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती?” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “गरिबी.” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.*


*वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘पन्नासला सहा देतोस का?’ असं दहापैकी नऊपण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?*

*फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टीकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!*

लेखक :
मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.
_______________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया आपणास आवाहन करीत आहे


ही झाली लेखकांची गोष्ट आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहत असतो... आता आपल्याकडे प्रगतीचे वारे वाहू लागलेले आहेत... घरी बसूनच आपण ऑनलाइन मटेरियल मागण्याच फॅड वाढलेल आहे‌.... दिवाळी एक उत्सवाचा सण... आपल्या दिवाळीमध्ये गोरगरिबांची पण दिवाळी आनंदात व्हावी असा एक पांयडा पाडण्यास काय हरकत आहे.... आपण हा सण सर्वजण आनंदात करत असतो.... हा आनंदाचा सण गोरगरिबांच्या पर्यंत सुद्धा त्यांचं कुटुंब त्यांचे पण संसार आनंदी व्हावा या उद्देशाने हा लेख प्रपंच.... 



रस्त्याकडेला एक म्हातारी बसून आपली भाजी विकत असते..... रस्त्याकडेला बसून एक महिला आपल्या मुलासह खेळणी विकत असते... रस्त्याकडेला बसवून फुटपाथवर बरेच फेरीवाले विक्रेते  आपापल्या वस्तू विकत असतात ....‌‌उच्चभ्रू ...पैसेवाले... आणखीन स्वतःला शिक्षित समजणारे लोक त्यांच्याशी घसा घाशी करूनच एखादी वस्तू फुकटात कशी मिळेल.‌‌ त्याच्या बाबतीत त्या विक्रेत्याबरोबर भाव तोल करत असतात....

          ही माणसं भिक मागत नाहीत.. 

तर आपल्या घरातल्यांचा संसार गाडा चालवण्यासाठी हा व्यवसाय करीत असतात कुणाचा पती गेला आहे, कुणाचा भाऊ गेलेला आहे, घरात करते कोण नसतात ,अशी लोकच ह्या रस्त्यावर येऊन आपल्या गुजरात करण्यासाठी,  आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वासाठी फूटपाथवर बसून आपला व्यवसाय करीत असतात‌.‌‌. भर उन्हात.‌ भर पावसात.‌ थंडीत ही माणसं कशाचीही तमा न बाळगता आपल्या पोटासाठी रस्त्यावर बसून असतात‌..... दिवाळी असो किंवा कोणताही सण असो .....परंतु आमची घासायची ठरलेली आहे‌‌..... त्याच्याकडून किती स्वस्तात मिळेल हे पाहण्यातच हे पैसेवाले लोक, खरेदी करणारे लोक धन्यता मानत असतात,, मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे घासा घाशी होत नाही... मोठ्या बेकरीमध्ये गेल्यानंतर तिथे घासा घाशी ्होत नाही.‌.‌ मोठ्या मॉलमध्ये गेल्यानंतर तिथे भाव तोल होत नाही परंतु भाव तोल करण्यासाठी हे फुटपाथचेच लोक आपल्याला भेटतात.... त्यांच्याकडून स्वस्तात आणल्याचा एक असुरी आनंद या उच्चभ्रू पैसेवाले, समजणाऱ्यांच्या महिला व पुरुषांना होत असतो‌...

 परंतु त्यांना आपण भीक नाही व्यवसायासाठी बसलेल्या ना... एक मदत म्हणून आपण दोन पैसे जास्त दिले तर आपलं काही जाणार नाही.... त्यांची दिवाळी चांगली होईल.... त्यांच्या मुलांच्या अंगावर चांगले नवीन कपडे येतील ...तर सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा... त्यांच्याकडून खरेदी करताना आपण कोणतीही भाव तोल किंवा घासा घाशी न करता ...त्यांना दोन पैसे मदत होईल अशा  विचाराने जर आपण त्यांच्याकडून खरेदी केली तर ही लोक जगण्यासाठी लागणारे पैसे याच्यातून उभा करतील‌.‌... आपला उदरनिर्वाह करतील..... परंतु आपल्या समाजात या लोकांचे बरोबरच घासा घाशी करण्याची पद्धत राहिलेली आहे .....तर समाजाने या लोकांच्याकडून आवर्जून काही ना काही खरेदी करावे ...ऑनलाइनच्या जमान्यात बाहेरून आलेल्या वस्तू आपण म्हणेल त्या किमतीत त्या कंपनीकडून घेत असतो.... परंतु या लोकांच्याकडून आपण काही ना काही खरेदी करून त्यांच्या घराला, त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचे पुण्यकार्य दिवाळीत करावं,, असं लोकसंदेश न्यूज मीडिया आपणास कळकळीचे आवाहन करीत आहे....

संपादक:लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________