MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
ऋतुजा लटकेंना हायकोर्टाचा दिलासा,.....उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करण्याचे आदेश...
तर उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी ही बातमी
उद्याच मी फॉर्म भरणार आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून "मशाल" या चिन्हातून निवडणूक लढवणार आहे...ऋतुजा लटकेंनी दिली माहीती*
आज कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. लटके यांच्या वकिलांनी आणि महापालिकेच्या वकिलांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला.
दरम्यान ऋतुजा लटकेंचा राजीनामा आदेश आजचं मुंबई महापालिकेकडून मंजुर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई:-आधीच शिवाजी पार्क मैदानावरून तोंडघशी पडलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा झटका दिला आहे.उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा आणि याचिकाकर्त्यांना काय निर्णय घेतला तसे कळवा, असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने.मुंबई महापालिकेला दिला आहे.
त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेसाठी उद्याच उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने ऐनवेळी ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना उद्धव गटातील कार्य़कर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.
रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती.अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार आणि दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला.पण ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी होत्या, त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता.पण तो मंजूर होत नव्हता.राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता. अखेर ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.आज गुरुवारी सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाल्यानंतर उद्या सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा असे निर्देश कोर्टाने महापालिकेला दिले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांचा राजीनामा अवघ्या काही दिवसात मंजूर केल्याचं यावेळी लटके यांच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.तसेच ऋतूजा लटके २७ सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर अशा दोन वेळेला राजीनामा दिला होता. मात्र, अनेक दिवस होऊनही महापालिकेने त्यावर अजून निर्णय दिलेला नाही. राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नसल्याचा त्यांनी म्हंटल.
त्यानंतर कोर्टाने पालिका वकिलांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितले. यावेळी ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराची तक्रार असल्याची माहिती महापालिका वकिलांनी दिली.12 ऑक्टोबरला म्हणजे कालच ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. लटके यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पालिकेत कधी आल्याचं नाहीत. त्यांनी ३० दिवसाचा नोटीस पिरियड पूर्ण करायला हवा होता असं पालिका वकिलांनी सांगितलं.
दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर कोर्टाने महापालिकेला फटकारलं आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा अशा सूचना महापालिकेला दिल्या.कोर्टाच्या या निर्णयानंतर लटके यांचा पोटनिवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने राजीनामा प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेना शाखा क्रमांक 79 या ठिकाणी शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू असून उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या ठिकाणी फटाके फोडून मिळण्याचे स्वागत देखील करण्यात आले आहे.
ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबरला तातडीने राजीनामा स्वीकारावा असा अर्ज केला होता. महापालिका आयुक्त हे विशेष प्रकरणात राजीनामा अर्ज स्वीकारू शकतात. मात्र हे प्रकरण नियमाला धरून नाही, असा युक्तीवाद महापालिकेच्या वकिलांनी केला.आयुक्तांनी नोटीस कालावधी माफ करण्याचा आपला विशेषाधिकार विशिष्ट पद्धतीने वापरावा, असे हायकोर्ट सांगू शकत नाही. जोपर्यंत राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत कर्मचारी पालिकेच्या सेवेतच असतो. एक महिना नोटीसच्या कालावधीतही आयुक्तांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो, असाही युक्तीवाद पालिकेच्या वकिलांनी केला.तसेच माझा राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असे म्हणण्याचा कर्मचाऱ्याला अधिकार नाही. तो कधी स्वीकारायचा हा अधिकार नोकरी देणाऱ्याचा असतो. अशा प्रकरणात कोर्टालाही आदेश देण्याचा अधिकार नसतो, असा पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद केला.
केवळ राजकीय दबावापोटी हे सर्व सुरु आहे. नियमानुसार आमची प्रक्रिया योग्य आहे. लटकेंविरोधात जी तक्रार झाली आहे ती एक दिवस आधी झाली आहे. त्यातील तक्रारदार हा अंधेरीचाच आहे. तर वकील हा पनवेलचा आहे हे कसं शक्य आहे. त्यामुळे हे जाणूनबुजून केलं जातंय, असा युक्तीवाद लटकेंच्या वकिलांना मांडला आहे.*
ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया...
न्यायदेवतेवर माझा विश्वास होता, त्या प्रमाणे मला न्याय मिळाला आहे. -माझे पती रमेश लटके यांनी जे कार्य केले, त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणार. -मला दिलासा वाटला, मात्र मला कोर्टात जायचं नव्हतं.उद्या निवडणुकीचा उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उद्याच मी फॉर्म भरणार आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल या चिन्हातून निवडणूक लढवणार आहे.मला पालिकेकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र तो पाठिंबा मिळाला नाही.माझ्यावर झालेले भ्रष्टाचाराने आरोप चुकीचे, याबाबत वकिलांशीच बोला.
लटकेंना ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही अटीतटीची लढाई आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या बाजूने ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी बीएमसीत राजीनामा टाकला होता. अखेर बऱ्याच युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने तो मंजूर केला आहे.उद्या 11 वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बीएमसीला दिला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________