SANGLI : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व आस्था बेघर महिला निवारा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सेवा पंधरवडा आणि ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व आस्था बेघर महिला निवारा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सेवा पंधरवडा आणि ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.




SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व आस्था बेघर महिला निवारा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सेवा पंधरवडा आणि ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. 


१ ऑक्टोंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व आस्था बेघर महिला निवारा केंद्र मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली व आस्था बेघर निवारण केंद्राच्या चाललेल्या उपक्रमाबद्दल ,विशेष कौतुक केले. व सामाजिक बांधिलकी या नात्याने संस्थेचे काम सर्वोत्तम आहे असे गौरवोद्गार काढले . तसेच महानगरपालिकेचे ॲम्बुलन्स गाडीचे ड्रायव्हर मुनीर गोलंदाज चाचा यांचा सेवानिवृत्त निमित्त संस्थेच्या वतीने व बार्टीच्या अधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मूनीर गोलंदाज चाचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आणि पुढील आयुष्यात सदरच्या संस्थेत सक्रिय सहभाग घेऊन कामकाज करीत राहणार आहोत सांगितले, यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिकांना फुल व फळे देऊन सत्कार करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे  सल्लागार मा.शाहीन शेख यांनी केले व आपले मनोगत ही व्यक्त केले. यावेळी संस्था स्वयंसेविका जन्नत शेख, आणि सुजाता काळे उपस्थित होत्या, या कार्यक्रमाचे आभार बार्टीचे समतादूत संग्रामसिंह छत्रे यांनी मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 




संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन   सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________