SANGLI: मिरज शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र सावंत्रे यांना निरोप.... तर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेकडून स्वागत....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: मिरज शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र सावंत्रे यांना निरोप.... तर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेकडून स्वागत....



SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

मिरज शहर पोलीस ठाण्याचे राजेंद्र सावंत्रे यांना निरोप.... तर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेकडून स्वागत....



मिरज शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा सांगली जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेकडून स्वागत करण्यात आले तर मावळते पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निरोप देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या, 


या प्रसंगी बोलताना पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले की, गणेशोत्सव, नवरात्र,ईद ए मिलाद ही सण कायदा व सुव्यवस्था राखत उत्तमरीत्या पार पाडणारे राजेंद्र सावंत्रे यांनी संवेदनशील असणारे मिरज शहर व्यवस्थितरित्या सांभाळले असे कौतुक केले,



तर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम ,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले आणि पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनामुळेच मिरजेसारख्या शहरात काम करू शकलो तसेच मिरजकर जनता,राजकीय नेते तसेच पत्रकार आणि पोलीस स्टाफ यांचे आभार मानले,



  तर नूतन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले की, मिरज शहरात 100 टक्के पोलिसिंग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.यावेळी पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर यांनी पत्रकारांच्या आणि पोलीस अधिकारी आणि स्टाफ च्या उपस्थितीत उगवत्या आणि मावळत्या पोलीस निरीक्षकांचा सत्कार केला, 



तर मिरज शहर वाहतूक शाखेचे नूतन प्रभारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांची निवड झाल्याने त्यांचे ही स्वागत जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी केले, 



यामध्ये मुंबई वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा झी 24 तास चे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र कांबळे, दै लोकमत चे जेष्ठ पत्रकार सदानंद औध्ये, एसबीएन मराठी चे संपादक तथा लोकशाही न्यूज चॅनेल चे जिल्हा प्रतिनिधी संजय देसाई, टीव्ही 9 जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन चे संपादक तथा जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे, साम टीव्ही मराठी चे जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील, आजतक च्या जिल्हा प्रतिनिधी स्वाती चिखलीकर, मराठीयन न्यूजचे जिल्हाप्रतिनिधी जमीर रहिमतपुरे, एसबीएन चे तालुका प्रतिनिधी तथा मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज तालुका अध्यक्ष आणि दैनिक बंधुता आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन चे अर्जुन यादव, एबी न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी तथा जिल्हा सहसचिव इम्तियाज शेख, दैनिक सकाळचे फोटोग्राफर सागर घाडगे,एम एच टेन न्युज सांगली चे संपादक गणेश चव्हाण सतर्क पोलिस टाईमचे तोहीद मुल्ला,महान कार्य न्युज चे आदीमाने,तिचा जागर न्युज चे आदिल मकानदार, उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 




संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन   सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________