SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील पलूसमध्ये लाच घेताना ‘महावितरण’च्या दोन अधिकाऱ्यांना पकडले, ‘लाचलुचपत’ची कारवाई
४५ हजार रुपये स्वीकारले, उप कार्यकारी अभियंत्यासह सहायक अभियंता जाळ्यात
साेलर जोडणीची फाईल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ४५ हजारांची लाच स्वीकारताना ‘महावितरण’च्या दोन अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. उप कार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेठकर (वय ४०, रा. कासार गल्ली, सोमवार पेठ, तासगाव) व सहायक अभियंता सागर विलास चव्हाण (३४, रा. नवेखेड, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पलूस येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदाराची सोलर जोडणीची कंपनी आहे. या कंपनीच्या वतीने जोडण्यात आलेल्या सोलर इन्टॉलेशनची फाईल मंजुरीसाठी पलूस उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अतुल पेठकर व सहायक अभियंता सागर चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपतकडे याची तक्रार केली.लाचलुचपतच्या पडताळणीत पेठकर व चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले हाेते.
त्या नुसार बुधवारी महावितरणच्या पलूस उपविभागीय कार्यालयात लाचलुचपतने सापळा लावला असता, उप कार्यकारी अभियंता पेठकर याने लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. यानंतर सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांवरही पलूस पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, सलीम मकानदार, रवींद्र धुमाळ, वीणा जाधव, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
______________________________________________
भ्रष्टाचाराचे कुरण.....
महावितरण असो, एमएसईबी असो, सर्वसाधारण लोकांच्या पर्यंत पोहोचणाऱ्या या संस्था आहेत, याच्या मध्ये भ्रष्टाचाराची मंदीयाळी आली आहे, हे प्रकरण म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे, पण वरच्या अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत महावितरण मध्ये काय चालते, एम एस ई बी व महावितरणचा कारभार कसा चालतो, ही सर्व जनता जाणून आहे ,सांगलीचे काही अधिकारी आम्ही फार काही स्वच्छ आहोत, आम्ही कधी ही एक रुपया कोणाच्या कडून घेत नाही, भ्रष्टाचाराचा व आमचा हजारो किलोमीटर पर्यंत संबंध नाही, असा जे आव् आणतात,
त्यांच्यासाठी ही एकच चपराक आहे, अधिकाऱ्यांनी जनतेच्या पगारातून आपलं काम करावं ...वरची कमाई ही भ्रष्ट आणि भ्रष्ट भ्रष्टाचारीच मानले जाते, परंतु या अधिकाऱ्यांना कोण सांगणार... साधं मीटरचं कनेक्शन घेण्यासाठी गेलं तरी 2000 च्या ठिकाणी सात हजार रुपये घेतल्याचे प्रकरण आम्ही ऐकलेले आहेत, पाहिलले आहे,
गोरगरिबांना कसं लुबाडून त्यांच्याकडून पैसे काढता येतील ,एवढाच एकमेव कार्यक्रम अधीक्षक, अधिकाऱ्या पासून शिपायापर्यंत एमएसईबी,महावितरण मध्ये चाललेला असतो, परंतु त्यांना वाटते की "मांजर डोळे बंद करून दूध पिते, आपल्याकडे कोणाच लक्षच नाही " परंतु बाबांनो ए पब्लिक आहे और पब्लिक सब जानती है. लाच लुचपत खात्याने अशा धाडी टाकलेल्याच आहेत परंतु आयकर खात्याने सुद्धा या भ्रष्टाचारी लोकांच्याकडे लक्ष देऊन त्यांचे भरतीच्या वेळेला कीती संपत्ती होती, आणि आज त्यांची संपत्ती कीती आहे याचा जरा हिशोब घातला तरी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा उलगडा होईल "सुज्ञाण्यास ज्यादा सांगणे न लगे "
सलीम नदाफ
संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
8830247886
______________________________________________
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________