SANGLI : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडून सांगली सिव्हील हॉस्पिटलच्या यंत्र सामुग्री साधने व इतर महत्वाच्या कामकाजा बाबत आढावा बैठक...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडून सांगली सिव्हील हॉस्पिटलच्या यंत्र सामुग्री साधने व इतर महत्वाच्या कामकाजा बाबत आढावा बैठक...



SANGLI : 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क


आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडून सांगली सिव्हील हॉस्पिटलच्या यंत्र सामुग्री साधने व इतर महत्वाच्या कामकाजा बाबत आढावा बैठक...


सांगली ८ ऑक्टोबर २०२२ :- पद्मभुषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्र सामुग्री साधने व इतर महत्वाच्या कामकाजासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा नियोजन समिती मार्फत उपलब्ध करून देणेबाबत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार उप. अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड, सहा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पवार, प्राध्यापक व विभाग प्रमुख क्ष किरणास्त्र डॉ. मनोहर कचरे, प्राध्यापक व विभाग प्रमुख रेडीओथेरेपी डॉ. एस.व्ही, अहंकारी, सहयोगी प्राध्यापक नेत्र शल्यचिकित्साशास्त्र डॉ. सतीश देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर पाटील, प्र. अधिसेविका अंजली वेदपाठक, सहा. अधिसेविका श्रीमती सुनिता भंडारे, प्र.प्राचार्या श्रीमती स्नेहा जाधव आदि उपस्थित होते.



सदर बैठकीत या रुग्णालयासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून खरेदी करावयाच्या यंत्र सामुग्री व साधन सामुग्रीची मागणी पत्रे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या व अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या यंत्र सामुग्रीची यादी वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड, यांनी सादर केली. तसेच मागणी करण्यात आलेल्या सर्व यंत्र सामुग्रीची माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना दिली.



सदर यादीमध्ये हाफकिन मंडळाकडून मागणी करण्यात आलेल्या यंत्र सामुग्रीचा व औषधांचा पुरवठा त्वरित होनेकरिता आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी हाफकिन संस्थेच्या मा. संचालकासोबत चर्चा करून योग्य ती कार्यवाही करत असलेबाबत ची माहिती त्यांना दिली.




 तसेच जिल्हा नियोजन समिती, सांगली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या यंत्र सामुग्रीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही सांगितले.
या रुग्णालयातील परिचर्या महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी एकूण ३० आसन क्षमता असलेली स्टुडन्ट बस आमदार निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल असे माननीय आमदार महोदयांनी बैठकीत सांगितले. तसेच इंटरनेट सेवा, रेडीओथेरेपी विभागासाठी नवीन अत्याधुनिक सुविधा असलेली मशीन आणि संबधित विभागातील रिक्त असणारे पद भरणेबाबत संचलनालय  स्तरावर चर्चा करण्यात येईल असे सांगितले.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________________________


             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
               __________________________________________________________________