KOLHAPUR : भिडे गुरुजींविरोधात कोल्हापूरात महिला पत्रकारांची निदर्शने,भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी महिला पत्रकारांनी केली आहे...!

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOLHAPUR : भिडे गुरुजींविरोधात कोल्हापूरात महिला पत्रकारांची निदर्शने,भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी महिला पत्रकारांनी केली आहे...!



KOLHAPUR 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

भिडे गुरुजींविरोधात कोल्हापूरात महिला पत्रकारांची निदर्शने,भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी महिला पत्रकारांनी केली आहे...



भिडे गुरुजी विरोधात कोल्हापूरात महिला पत्रकारांची निदर्शने
आधी टिकली लाव मग
संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात कोल्हापुरातील महिला पत्रकारांनी निदर्शने केली.
दसरा चौक येथे आंदोलनावेळी टिकली लावणे हा प्रत्येक महिलेची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.



भिडे गुरुजींचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
क्रांतीसिहच्या संपादिका सुनंदा मोरे, श्रद्धा जोगळेकर,
शुभांगी तावरे, अश्विनी खोंद्रे,
सीमा पवार, दीक्षा घोरपडे,
अर्पणा माने, कल्याणी अमनगी, अर्चना बनगे, क्षनिक्षा धनवडे आदी उपस्थित होत्या

          काय म्हणाले होते भिडे गुरुजी

संभाजी भिडे यांचं एक वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते.
तेव्हा महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना प्रश्न विचारला असता भिडे गुरुजी म्हणाले
‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे.
भारत माता विधवा नाही.
कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली होती.
या नंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे......

          सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया


या सगळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फेसबुकवर एक पोस्ट टाकून संभाजी भिडे यांना चांगलेच फटकारले.


सुप्रिया सुळे यांच्या त्यांच्या फेसबुक पेजवर हेरंब कुलकर्णी यांची 'तू आणि मी' ही कविता शेअर केली आहे. या कवितेमधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मनोवृत्तीवर निशाणा साधण्यात आला आहे. यावर आता संभाजी भिडे यांचे समर्थक काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहावे लागेल.....

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर वादात शरद पोंक्षे यांची उडी....



कुंकू टिकली वादावर शरद पोंक्षे यांचा अप्रत्यक्ष टोला! चर्चचा फोटो शेअर करत म्हणाले, “पाद्रींचे आडनाव भिडे…”

स्त्री स्वातंत्र्यावर आज अनेकजण भाष्य करताना दिसून येत आहेत

मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीतील आघाडीचे शरद पोंक्षे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते कायमच सक्रिय असतात. सामाजिक, मुद्द्यांवर ते कायमच भाष्य करताना कायम चर्चेत येतात. सध्या भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्त्यावामुळे एकच समाजमाध्यमात चर्चा सुरु आहे ती स्त्री स्वातंत्र्याची, त्यावरच भाष्य करणारी एक पोस्ट शरद पोंकसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे.

शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये एका चर्च बाहेरचा फोटो शेअर केला आहे. पोस्टला कॅप्शन देत म्हणाले, ‘एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही.’ असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे त्यांनी नमूद केले आहे की ‘सध्याच्या परिस्थितीशी याचा संबंध नाही’, मात्र त्यांची ही पोस्ट नक्कीच सध्याच्या घटनेला टोला लगवणारी आहे.

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराने कुंकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यांच्या या घटनेचा अनेकांनी निषेध केला. महिला आयोगाने संभाजी भिडेंच्या विधानाची दखल घेतली असून त्यांना नोटीस पाठवली आहे.
                     दरम्यान

        संभाजी भिडेंना ते वक्तव्य भोवणार?

संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. मात्र संभाजी भिडेंना हे वक्तव्य आता चांगलंच भोवणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे. यावर संभाजी भिडे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल....


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली