NANDED
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
'भारत जोडो' यात्रेचा आज
महाराष्ट्रात प्रवेश.. काँग्रेसकडून जय्यत तयारी .. .रात्री नऊ किलोमीटर निघणार मशाल यात्रा... काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.... सुरुवात होणार नांदेड मधून...
नांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आज, 7 नोव्हेंबर नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करेल. यावेळी पदयात्रेकरूंच्या हातात मशाली असतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
*पहिल्यांदाच मशाल यात्रा*
यात्रा आज, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास देगलूर येथे पोहोचेल येथून पुढे वन्नाळीकडे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास यात्रा मार्गक्रमण करेल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
यात्रा नांदेडात चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करेल. नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील.
मंगळवारचा मुक्काम शंकरनगर रामतीर्थ, बुधवारी वझिरगाव फाटा, गुरुवार- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होईल.
भारत जोडो यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे.
८ नोव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री बारा वाजता गुरुद्वारात जाऊन खासदार राहुल गांधी हे दर्शन घेणार आहेत.
या यात्रेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल...
७ नोव्हेंबर २०२२
महाराष्ट्रामध्ये आगमन.....
दि. ७ ते २० नोव्हेंबर २०२२, महाराष्ट्र
नांदेड जिल्हा • दि. ७ ते ११ नोव्हेंबर.
हिंगोली जिल्हा - दि. ११ ते १५ नोव्हेंबर.
वाशिम जिल्हा - दि. १५ ते १६ नोव्हेंबर.
अकोला जिल्हा - दि. १६ ते १८ नोव्हेंबर.
बुलढाणा जिल्हा - दि. १८ ते २० नोव्हेंबर.
या मध्ये
दोन जाहीर सभा पुढील प्रमाणे होणार आहेत
नांदेड : दि. १० नोव्हेंबर सायं. ५ वा. मोंढा मैदान.
शेगाव : दि. १८ नोव्हेंबर दुपारी ३ वा.
महाराष्ट्रात ३८२ किलोमीटरची यात्रा करून ही यात्रा मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करेल...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT LTD.
MUMBAI.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________