SANGLI :आगामी निवडणुका भाजप मित्र पक्षांसमवेत सर्व ताकतीने लढणार : पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे : मिरजेत भाजपच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI :आगामी निवडणुका भाजप मित्र पक्षांसमवेत सर्व ताकतीने लढणार : पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे : मिरजेत भाजपच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न....




SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

आगामी निवडणुका भाजप मित्र पक्षांसमवेत सर्व ताकतीने लढणार : पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे : मिरजेत भाजपच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न....

आगामी ग्रामपंचायत निवडणूक पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी आपल्या सर्व मित्र पक्षांना समवेत घेऊन सर्व ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी केले.


भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मिरजेत पार पडली यावेळी मंत्री सुरेश खाडे यांनी मार्गदर्शन केले.


ते म्हणाले ग्रामपंचायत निवडणूक पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक मार्केट कमिटी निवडणूक आगामी महापालिका निवडणूक यासह येणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीने मोठ्या ताकदीने लढायचे आहेत. भाजपबरोबर शिवसेना व इतर सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन या निवडणुका लढाईच्या आहेत. यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निधीबाबत अन्याय केला जात होता मात्र आता आपली सत्ता आली आहे त्यामुळे सर्व तालुक्यातील नेत्यांना पालकमंत्र्याच्या कोट्यातून समान निधी वाटप केला जाईल. या बैठकीत तालुकास्तरीय कमिटी जिल्हास्तरीय कमिटी विशेष कार्यकारी अधिकारी जिल्हा नियोजन समिती निधी वाटप याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन ही मंत्री खाडे यांनी केले.


यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर कडेगाव चे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, रमेश शेंडगे, भगवान साळुंखे, दिनकर पाटील, नितीन शिंदे, रवींद्र आरळी, संग्राम देशमुख, राजाराम गरुड, सुरेंद्र चौगुले, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख, मिलिंद कोरे, स्वप्निल पाटील, निशिकांत पाटील, शेखर इनामदार, नीताताई केळकर, पृथ्वीराज पवार, भारतीताई दिगडे, स्वातीताई शिंदे, धीरज सूर्यवंशी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे, प्रकाश ढंग उपस्थित होते.

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________