SANGLI : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली संभाजी भिडे गुरुजी यांची भेट....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली संभाजी भिडे गुरुजी यांची भेट....SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी 

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली संभाजी भिडे गुरुजी यांची भेट....

सांगली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.


रविवारी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे हे संघटनात्मक सांगली जिल्हा दौरा होते. यावेळी सायंकाळी 5.00 वा. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘दत्त निवास’ येथे भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यापूर्वी भिडे गुरुजींने श्री बावनकुळे यांचे शाल व श्रीफळ देत स्वागत केले.


भेटीनंतर श्री बावनकुळे यांनी संभाजी भिडे गुरुजीच्या साधेपणासह त्यांच्या विनम्रतेची प्रशंसा केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचे मत व्यक्त करीत ही भेट अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पृथ्वीराजबाबा देशमुख, शहरअध्यक्ष दीपकबाबा शिंदे , माजी आमदार नितीन राजे शिंदे, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार प्रदेश सदस्य शेखर इनामदार, निताताई केळकर सरचिटणीस केदार खाडिलकर सतीश खंडागळे, श्रेयस जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिवप्रतिष्ठान चे हणमंत पवार, अंकुश जाधव, सचिन पवार, प्रफुल्ल चव्हाण, राहुल बोळाज, मंगेश तांदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
                        www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________