ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
सांगली, दि. 19,: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 18 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. 20 डिसेंबर 2022 रोजी होत असून मतमोजणीसाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना आणि पूर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.


ग्रामपंचायत मतमोजणी कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या. या आढावा बैठकीस व्हीडिओ कॉन्फरन्सव्दारे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार सहभागी झाले होते.


तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे पुढीलप्रमाणे. मिरज - शासकीय धान्य गोडावून वैरण बाजार मिरज, कवठेमहांकाळ - तहसिल कार्यालय कवठेमहांकाळ, नवीन प्रशासकीय इमारत कवठेमहांकाळ, तासगाव - बहुउद्देशीय हॉल तहसिल कार्यालय तासगाव,  खानापूर-विटा - शासकीय धान्य गोदाम हणमंत नगर, उपविभागीय अधिकारी विटा यांचे कार्यालयासमोर, आटपाडी - मध्यवर्ती प्रशासकीय भवन आटपाडी, तहसिल कार्यालय आटपाडी पहिला मजला मिटींग हॉल, जत - तहसिल कार्यालय जत, पलूस - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पलूस, कडेगाव - महात्मा गांधी विद्यालय कडेगाव, वाळवा - शासकीय धान्य गोदाम इस्लामपूर आणि शिराळा - तहसिल कार्यालय शिराळा नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात.

जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी  दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे.


  मिरज तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींची 22 टेबलावर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. तासगाव तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलवर होणार आहे. कवठेमहांकाळ  तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे. जत  तालुक्यातील 77 ग्रामपंचायतींची 20 टेबलावर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे.  खानापूर-विटा  तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची 16 टेबलावर 8 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलवर होणार आहे. आटपाडी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 6 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. कडेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींची 19 टेबलावर 9 फेरीत मतमोजणी होणार आहे. पलूस तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची 14 टेबलावर 7 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी एका टेबलवर होणार आहे. वाळवा तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींची 30 टेबलावर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी चार टेबलवर होणार आहे. शिराळा तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर 15 फेरीत मतमोजणी होणार आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी तीन टेबलवर होणार आहे.


मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम जितके टेबल आहेत त्या टेबल वरती पूर्ण एक गाव अशा पध्दतीने जेवढी गांवे एकावेळी टेबलवर घेता येतात त्याप्रमाणे त्या गावांचे प्रतिनिधी / उमेदवार यांना मतमोजणी कक्षामध्ये पासधारकांना प्रवेश दिला जाणार आहे व त्या गावची मतमोजणी संपल्यानंतर सदर उमेदवार बाहेर गेल्यानंतर इतर गावांची मतमोजणी केली जाणार आहे. तसेच गर्दी तसेच जमाव एकत्रित येऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
                        www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________