MUMBAI
सौदीकडून हज यात्रेसाठी यंदा भारताला सर्वोच्च कोटा....
देशातील एक लाख ७५ हजार २५ मुस्लिमांना यंदा संधी
यात्रेकरूंच्या वयोमर्यादिसह सौदी अरेबियाकडून सर्व निर्बंध शिथिल...
जगभरातील सर्व वयोगटातील मुस्लिम
मक्केला जाऊ शकणार
हजसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरूवात....
रियाध वृत्तसंस्था : यंदा सौदी अरेबियाने भारतासाठी कोटा या वेळी वाढवला आहे आता भारतातून 1 लाख 75 हजार 525 भारतीय हज यात्रेकरिता जाऊ शकणार आहेत, कोणत्याही देशासाठी आतापर्यंतचा हा सर्वोच्च कोटा आहे. २०१९ मध्ये एक लाख ४० हजार भारतीयांनी यात्रा केली होती.
सौदी अरेबियाने हज यात्रेवर कोरोना काळात घातलेले सर्व निर्बंध आता पूर्णपणे हटवले आहेत. हज यात्रेसाठी असणारी वयो मर्यादेची अट आता हटवली आहे त्या मुळे आता. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आता हज यात्रेला जाता येईल.
हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून, १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. हज यात्रेकरु हज मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन थेट अर्ज करू शकतात. एक मोबाईल नंबर एका पेक्षा जास्त अर्जास वापरू नये असे कळविण्यात आले आहे.
| २०१९ ला जगभरातून २५ लाख, २० मध्ये १ हजार लोकांची हज यात्रा झाली
२०१९ मध्ये जगभरातून २५ लाख लोक हजला गेले होते. २०२० मध्ये कोरोनामुळे ही संख्या रोडावून एक हजारवर आली होती. कोरोना काळात सौदी अरेबियाच्या रहिवाशांना तसेच २० ते ५० वर्षे वयोगटातील लोकांनाच हज यात्रा करता आली होती.
• २०२१ मध्ये आणखी काही निर्बंधांसह सौदीच्याच ६० हजार
लोकांना हजची परवानगी देण्यात आली होती. २०२२ मध्ये मात्र अन्य देशांतील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्यांना परवानगी देण्यात आली होती.
यंदा उमरा व्हीसाचा कालावधीही 30 दिवसापासून.. 90 दिवसापर्यंत वाढवण्यात आलाआहे असे ...
तौफिक अरबिया, हज आणि उमरा मंत्री, सौदी अरेबिया यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे..
अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करावा...
777 499 3544
965 786 3365
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली