भाजप पदाधिकाऱ्यांमधील फ्री स्टाईल हाणामारी टक्केवारीसाठीच ! महानगरीची पूरती बेअब्रू - पृथ्वीराज पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भाजप पदाधिकाऱ्यांमधील फ्री स्टाईल हाणामारी टक्केवारीसाठीच ! महानगरीची पूरती बेअब्रू - पृथ्वीराज पाटीललोकसंदेश न्यूज नेटवर्क

भाजप पदाधिकाऱ्यांमधील फ्री स्टाईल हाणामारी टक्केवारीसाठीच ! महानगरीची पूरती बेअब्रू
- पृथ्वीराज पाटील

सांगली, दि. २१ :
सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि भाजपमधीलच अन्य एक पदाधिकारी यांच्यामधील फ्री स्टाईल हाणामारी टक्केवारीसाठीच झाल्याचे सिद्ध झाले आहे,

या प्रकारामुळे महानगरीची पुरती बेअब्रू झाली आहे. पार्टी विथ डिफरन्स असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा हाच का चेहरा ? असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले, भाजप पदाधिकाऱ्यांमधील ही हाणामारी चक्क महापालिकेच्या आवारातच घडलेली आहे. त्यांच्याकडे महापालिकेतील एकच महत्त्वाचे पद आहे, तरी एवढी हाणामारी झाली,
आख्खी महापालिका ताब्यात असती तर त्यांनी ती विकायलाही मागे पुढे पाहिले नसते. भाजपा हा सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे, असा डांगोरा पिटणाऱ्या आमदारांचे हाणामारी करणारे हे डावे आणि उजवे पदाधिकारी आहेत. हाच का त्यांचा सुसंस्कृतपणा ? यावर ते गप्प का?

भाजप पदाधिकाऱ्यांमधील फ्री स्टाईल हाणामारी टक्केवारीसाठीच ! महानगरीची पूरती बेअब्रू
- पृथ्वीराज पाटील


महापालिका स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर ही हाणामारी झाली आहे. प्रभाग क्रमांक नऊमधील चैत्रबन नाल्याच्या दहा कोटींच्या कामाच्या टेंडरवरून ही हाणामारी झाली आहे.अर्थातच त्यामागे टक्केवारीचे गणित आहे, हे लोक विकासासाठी भांडत नाहीत, तर टक्केवारीसाठी भांडतात. मागेही एकदा टक्केवारीवरूनच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये महापालिकेत असा प्रकार घडला होता, भाजपाचा हा चेहरा नागरिकांंच्यासमोर उघड झाला आहे, असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
-----

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.