कोल्हापूर लोकसंदेश जिल्हा प्रतिनिधी..
खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गासाठी 6581 कोटी 45 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल देशाचे केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचे विशेष आभार
खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीनुसार खालील रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे
1) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील आंबा ते पैजारवाडी या विभागाचे चौपदरीकरण करणे या 45.200 किलोमीटर लांबीच्या कामासाठी 2191 कोटी रुपये
2) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील पैजारवाडी ते चोकाक या विभागाच्या चौपदरीकरणाचे 32.960 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी 2131 कोटी रुपये
3) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 एच पेठ नाका ते सांगली या 41.250 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करणे कामासाठी 860.45 कोटी रुपये
4) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कासेगाव ते शिरोली या 43 किलोमीटरच्या लांबीसाठी 1399 कोटी रुपये
असे एकूण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी 6581 कोटी 45 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
____________________________________________________
ग्रोथ इंडिया एडवर्टाइजमेंट कंपनी, मुंबई / सांगली
9850155823