लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
*प्रदेश सचिव ज्योती अदाटे यांचा आदाटे राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने गौरव
प्रतिष्ठा फौंडेशन तासगांव आयोजित 7 वे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन 2023 च्या सोहळ्यात राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश सचिव मा.ज्योती आदाटे यांना जेष्ठ विचारवंत आणि श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते *समाजरत्न* हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी या संस्थेचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव म्हणाले की ज्योती ताईंना हा पुरस्कार देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय.सांगली जिल्ह्यातली रणरागिणी म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या 35 वर्षांपासून अगदी शालेय जीवनापासूनच त्या सामाजिक चळवळीत अग्रेसर आहेत.त्या एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी शालेय व महाविद्यालयीन प्रश्नांसाठी लढा दिला पुढे अनेक वर्षांपासून आजतागायत त्या शोषितांच्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढतच आहेत.त्यांची कोणतीही राजकीय सामाजिक कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागात निवडुन येऊन हॅट्रीक नगरसेविका म्हणून मान मिळवला आहे.
विषेश म्हणजे त्या पहिल्यांदा निवडून आल्या तेव्हा त्या बी ए च्या पहिल्या वर्षात शिकत होत्या त्या प्रभाग समितीच्या सभापती आणि स्थायी समिती सदस्य म्हणून अनेक वर्षे कार्यरत होत्या.त्या संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रचंड कामे केली कोरोणाच्या काळात सुध्दा जिवाची पर्वा न करता जिल्हात विविध भागात जाऊन योजनेबाबत प्रशिक्षण शिबीर मेळावे आयोजित करून जास्तीत जास्त वंचित घटकांपर्यंत त्यांनी योजना पोहोचविल्या अगदी वारांगनाच्या दारात समितीला नेऊन त्यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला.त्या आकार फौंडेशनच्या ट्रस्टी आहेत जी एकल व अनाथ मुलांच्या जीवनाला आकार देते या संस्थेत दाखल झालेल्या एका मुलीचे पालकत्व घेऊन तिच्या शिक्षणाची जबाबदारी पेलत आहेत.त्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंच च्या जिल्हा कार्याध्यक्ष आहेत त्या व त्यांच्या टिमने जिल्ह्यातील अनेक भोंदू बाबांचा पर्दाफाश केला आहे.सर्वसामान्याचे आर्थिक मानसिक भावनिक आणि शारीरिक शोषण होऊ नये यासाठी त्या जीवावर उदार होऊन अविरतपणे झटत असतात.खेडोपाड्यात शहरातील विविध भागात शाळा काॅलेजात जाऊन त्यांनी टीम सोबत चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकेसहित व्याख्याने दिली आहेत.त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या जिल्हा उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. जणु काय विद्रोह त्यांच्या रक्तातच आहे ज्योती ताईं नी त्याच्या वडीलांच्या मृत्यूवेळी सगळ्या परंपरेला फाटा देऊन पै पाहुणे आणि भावकी यांना न जुमानता आपल्या पित्याला अग्नी दिला व त्याच्या अस्थी पाण्यात न टाकता झाडांना घालून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी पुढाकार घेऊन वडीलांचे नेत्रदान करुन घेतले दुखात सुध्दा स्वतः ला ढळु न देता आपले सामाजिक भान त्या जपत असतात.ऐन तारुण्यात अनेक वर्षे वृध्दाश्रमात राहुन त्यांनी आज्यांची सेवा करून शिक्षण घेतले आहे त्या पदवीधर आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात देखिल मागे नाहीत अनेक नाटकांमधून आणि चित्रपटात काम केले आहे त्या अखिल भारतीय मराठी नाट्य व चित्रपट महामंडळावर आजीव सभासद आहेत.त्या त्यांच्या व्यवसायात देखिल आघाडीवर आहेत विमा प्रतिनिधी म्हणून गेल्या 27 वर्षांपासून कार्यरत आहेत सलग 23 वर्षे विमा कोट्याधिश शतकवीर आणि द्विशतकवीर म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे त्यांनी या विमा व्यवसायात अमेरिकेचा जागतिक पुरस्कार प्राप्त केला आहे.
अशा या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि व्यवसायिक अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ज्योती ताईंना हा पुरस्कार देताना अत्यानंद होत आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यात जेष्ठ विचारवंत डॉ प्रा बाबुराव गुरव, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील, लोकप्रिय युवा नेते जितेश भैया कदम, उद्योगपती राजेंद्र सिंह पाटील,आयडीयल अॅग्रो रिसर्च चे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश औताडे, कवयित्री मनिषाताई पाटील असंघटित महिला आघाडीच्या अध्यक्षा संगिता जाधव, अनिता चौगुले माथाडी संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव इ मान्यवर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
____________________________________________________________
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________