मुली शहरात शिक्षणासाठी जातात आणि भाड्याच्या खोलीत… नवनीत राणा यांचं वादग्रस्त वक्तव्य

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुली शहरात शिक्षणासाठी जातात आणि भाड्याच्या खोलीत… नवनीत राणा यांचं वादग्रस्त वक्तव्य
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

मुली शहरात शिक्षणासाठी जातात आणि भाड्याच्या खोलीत… नवनीत राणा यांचं वादग्रस्त वक्तव्यआई वडील हे आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात, तिथे त्या भाड्याच्या खोलीत मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात”, असे वादग्रस्त विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं. अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यावरून आता वादाला तोंड फुटणार आहे.*”मी देखील याच पिढीतली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल मला काहीच माहित नव्हतं. मी माझ्या जीवनात त्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. हल्ली मी ऐकतेय मुलं मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. आई वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. तिथे मुली मुलांसोबत भाड्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली?” असे नवनीत राणा म्हणाल्या.


” मी हे सर्व इंस्टाग्राम सोशल मीडियावर पाहत असते. त्याचं फार वाईट वाटतं. ते दुख माझ्या मनात कुठे ना कुठेतरी आहे. आपल्या तरुण पिढीत ही गोष्ट कुठून आली नेमकी? आपल्याला स्वावलंबी करायला आपल्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी केलं. म्हणून आपण स्वावलंबी झालो, एका पदापर्यंत पोहोचलो. त्यानंतर कमवायला काय लागलो म्हणून असं वागायचं? ही आपली संस्कृती नाही” असे नवनीत राणा म्हणाल्या.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.