SANGLI: नेते एकत्र राहिले तरच पक्ष राहील मजबूत ... विश्वजित कदम : सांगलीमधून कॉंग्रेसच्या अभियानास प्रारंभ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: नेते एकत्र राहिले तरच पक्ष राहील मजबूत ... विश्वजित कदम : सांगलीमधून कॉंग्रेसच्या अभियानास प्रारंभ




लोकसंदेश न्यूज नेटवर्क सांगली

नेते एकत्र राहिले तरच पक्ष राहील मजबूत ...

विश्वजित कदम : सांगलीमधून कॉंग्रेसच्या अभियानास प्रारंभ

जनतेच्या हातात हात मिळविण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान कॉंग्रेस राबवत असतानाच जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे हात ही एकमेकांच्या हातात असतील, ते पक्ष मजबुतीसाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आ. विश्वजित कदम यांनी केले.

सांगलीच्या कच्छी जैन भवनात बुधवारी काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो' अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी आमदार पी. एन. पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, पक्षाचे प्रभारी संजय बालगुडे, सह प्रभारी अभय साळुंखे, जितेश कदम आदी उपस्थित होते.

विश्वजित कदम म्हणाले की, संपूर्ण देशात नवी ऊर्जा निर्माण करण्याचे


काम पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेतून केले. द्वेष भावना दूर करुन देशबांधवांना जोडण्याचा संदेश देत त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. आता जिल्ह्यातील काँग्रेसही जनतेच्या हातात हात देऊन पुढे जाईल. जनतेशी संवाद साधून त्यांच्याशी असलेले नाते घट्ट करण्यातं येईल. लोकांना जोडत असताना काँग्रेसचे नेतेही एकमेकांस तसेच
जोडले गेले पाहिजेत.

त्यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. हा समन्वय राखून सर्व नेत्यांनी एकत्रित काम केल्यास जिल्ह्यात पक्ष आणखी पक्ष मजबूत होईल

ते म्हणाले, भाजपच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीही नाही. यामागे अनेक छुपे अजेंडे आहेत. त्यांचा अभ्यास करुन आम्ही ते जनतेसमोर मांडू. पक्षाला मजबूत करण्याकामी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले...

विशाल पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या पाहिली तर जिल्ह्यातील प्रत्येक उंबरठ्यापर्यंत आपण पोहचायला हवे. प्रत्येक घरात जाऊन राहुल गांधी यांचा संदेश पोहचविण्याचे काम केले..
...
___________________________________________
संपादकीय,

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा संपूर्ण भारतभरात दौरा चर्चेत राहिला गोदी मीडियाने या दौऱ्यास म्हणावे तशी प्रसिद्धी दिली नाही.... . महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस नेते फोटो पुरते राहुल गांधी यांच्याबरोबर चालले...
 पक्षात नेत्याने व कार्यकर्त्यांनी एकत्र राहण्याचा सल्ला बाळासाहेबांनी दिला खरा.......

मग सांगलीतील काँग्रेसचा एक ही नगरसेवक आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिला नाही? याचं गणित सांगलीकरांना कळलेलं नाही... सांगली काँग्रेसमध्ये चार वेगवेगळे गट काम करतात हे सगळं सर्वज्ञात आहे...
या वेगवेगळ्या गटाची तोंड एकमेकांच्या विरोधात का आहेत असा सवाल सांगलीकरांना भेडसावत आहे

सांगली शहराची उघडपणे "दैना" होत असताना तत्कालीन मंत्री म्हणून आपण होतात आपण सांगलीसाठी काय केलं याचा अभ्यास परत एकदा करावा लागेल, काँग्रेस पक्षाची धोरण चांगली आहेत.. सर्वसाधारण तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचे काम काँग्रेसने 70 वर्षात केलेलेच आहे.. परंतु या पक्षाला एक अलीकडे "शाप " लागलेला आहे तो म्हणजे पक्षातूनच कार्यकर्त्यांची फुटीचा.. हे कार्यकर्ते म्हणायला पक्षात आहेत मात्र ती एकमेकाची तोंड देखील पाहत नाहीत हे कालच्या मेळाव्यात दिसून आलेल आहे.. सांगलीमध्ये किती नगरसेवक काँग्रेसचे आहेत आणि किती नगरसेवकांनी या कार्यक्रमास  हजेरी लावली हा एक शोध विषय होऊ शकतो.

या कार्यक्रमावर स्टेजवरील गर्दी पाहता हा कार्यक्रम फक्त पाहुणेरावळ्यांचाच असल्याचे दिसून येत आहे आणि पक्षांमध्ये फक्त पाहुणे हजर राहिले तर मग कसं होणार ...आपण तर सल्ला दिला "काँग्रेस नेत्यांनी एकत्रित काम करावे" मात्र काँग्रेससाठी आपणापासून सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र येण्यासाठी काय केले याचा खुलासा आपणच एक वेळ करावा..
सांगलीमध्ये ज्या ज्या निवडणुका या दहा वर्षात झालेल्या आहेत त्यामध्ये आपली भूमिका सगळ्या सांगलीकरांना चांगली माहिती आहे...


 सांगलीमध्ये गटातटाच्या राजकारणातून एकमेकाचे पाय ओढण्याचे काम प्रत्येक नेत्याने केलेल आहे ...जो तो आपल साम्राज्य टिकवण्याच्या नादात काँग्रेस मात्र तळाला गेली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही
ज्या लोकांनी सतरंज्या उचलल्या ज्यांनी काँग्रेस कमिटी जिवंत ठेवली अशा "काँग्रेस सेवा दलाचा" परवा कार्यक्रम झाला परंतु आपणांसह कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याने त्या कार्यक्रमास हजेरी लावली नाही व त्यांना आर्थिक मदत केलेली नाही असे कळून येत आहे.. 

ज्या लोकांचे मुळे काँग्रेस कमिटी उघडी राहते त्या लोकांना देखील  बाळासाहेब तुम्ही व तुमच्या पक्षातर्फे या गटातटाच्या राजकारणाने या सेवाद्लास अक्षरशः बाजूला केलत .. 


आता ही सेवादलाचे कार्यकर्ते म्हणजे गरीब माणस आहेत.. त्यांच्याकडे कुठले कारखाने, दवाखाने, किंवा मोठ्या मोठ्या संस्था नाहीत, परंतु त्यांना सुद्धा मदत करण्याची "दानत" सांगलीतील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना नसावी... मग आपण म्हणताय तसं काँग्रेस नेते एकत्रित कशी येतील... सांगलीमध्ये काँग्रेससाठी चांगलं वातावरण आहे.. मात्र प्रत्येक गल्लीत चार काँग्रेसचे गट काम करतात... मग पक्षाचे नगरसेवक तर कसे निवडून येतील याचा विचार करण्याची गरज आहे ...

लोकप्रतिनिधी नेत्यांची तोंड वेगवेगळे असतील तर .
..
सांगलीच काय खरं नाही..सांगलीमध्ये बाहेरच्या लोकांनी राज्य करण्याचे ठरवलेले आहे असू दे... तो एक राजकारणाचा भाग असावा... मात्र या बाहेरून आलेल्या नेत्यांना सांगली बद्दल मग तो कोणत्याही पक्षाच्या असो, या नेत्याना सांगली शहारा विषयी कोणती ही "आस्था" नाही  ..ही बाहेरील मंडळी किंवा नेते सांगलीचे कोणतही कल्याण करणार नाहीत.. या दहा वर्षात बरीच सत्तांतरे झाली पण मंत्री म्हणून किंवा नेते म्हणून सांगलीचा फायदा घेणारे व सांगलीतून निवडून जाणारे ,सांगली वर राज्य करणारे नेत्यांनी, कोणत्या नेत्याने सांगलीसाठी भरीव काम केलेलं त्या सर्व पक्षाचे नेत्यांनी एक वेळ सांगाव...
 सांगलीच कसं "वाटोळ" होईल याच्याकडेच या नेत्यांनी लक्ष दिलेल आहे आणि त्यांची पिल्लावळ या नेत्यांचा उदो उदो करत आहेत... सांगलीचा वापर आपल्या राजकारणासाठी पद्धतशीरपणे वापरून सांगली शहराचं कसं "वाटोळ" होईल हेच या सर्व पक्षांच्या नेत्यांनी पाहिलेल आहे आता सांगलीकर सुज्ञ झालेले आहेत ..

आम्ही वारंवार आमच्या लेखात म्हणतोच आहे की, कोणत्याही पक्षाचा नेता असो तो बाहेरगावावरून येऊन सांगली वर सत्ता गाजवतो आहे हे नेते सांगलीच "एक वेळा वाटोळं झालं की" आपल्या आपल्या गावी झोला लेके निकल जायेंगे' अशातला प्रकार होणार आहे ..होत आहे असो ...या सांगलीला फक्त देवच वाचवू शकतो...

संपादक: सलीम नदाफ; संपादक ,लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली
8830247886

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली