लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
प्रभाग क्रं.10 मध्ये सुधीर दादा गाडगीळ यांच्या "आमदार फंडातून" विकास कामांचे उद्घाटन...
सांगलीचे कार्यसम्राट आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्या आमदार फंडातून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं. १० मधील अथर्व लक्झरी याच्या पूर्वेस उत्तर दक्षिण तसेच गोल्डन पार्क मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण या विकास याकामांचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले,
या प्रभागाचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व नगरसेविका अनारकली कुरणे यांच्या प्रयत्नातुन सांगलीचे आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्या आमदार फंडातुन बायपास रोड वरील अथर्व लक्झरीया अपार्टमेंट समोरील रस्ता डांबरीकरण करणेसाठी 15 लाख 74 हजार तसेच गोल्डन पार्क येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणेसाठी रक्कम 8 लाख 47 हजार असे एकूण 24 लाख 21 हजार इतक्या रस्ते डांबरीकरणासाठी निधी देण्यात आला, या विकासकामामुळे याभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मुन्नाभाई कुरणे, नगरसेवक जगन्नाथदादा ठोकळे, नगरसेविका अनारकलीताई कुरणे,जेष्ठ कार्यकर्ते रामकृष्ण चितळे,सुरज पवार,जमीर कुरणे,प्रफुल्ल ठोकळे,कैलास पाटील,प्रशांत शहा,विद्या बाबर,किरण बाबर,वैभव पाटील,हरीश पडियार,मीना छटिया, आशुतोष कलकुटगी,जितेंद्र बनसोडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरुण पवार आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.तसेच यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी श्री गणेश मंदिरात जाऊन श्रीं चे दर्शन घेतले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली