सामाजिक कार्यकर्त्या,वेध फांउडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ.रजनीताई शिंदे यांना सह्याद्री संविधानिक 2023 राष्ट्रीय ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्त्या,वेध फांउडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ.रजनीताई शिंदे यांना सह्याद्री संविधानिक 2023 राष्ट्रीय ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान..लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्या,वेध फांउडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ.रजनीताई शिंदे यांना सह्याद्री संविधानिक 2023 राष्ट्रीय ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान


सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मँनेजमेंट महाराष्ट्र राज्य चा 16 वा वर्धापन दिन आणि संस्थापक अध्यक्ष कै.विलासराव वाईकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम जयसिंगपूर येथील सहकारमहर्षि कै.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये पार पडला. 

 इचलकरंजी येथील सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच जवळपास दिड हजार महिलांच्या माध्यमातून बचत गटांना सक्षमपणे चालना देण्यासाठी अथक प्रयत्न करत महिला सक्षमीकरण, सबलीकरण,महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिबिरांचे आयोजन,अनेक मोठमोठ्या प्रदर्शनात बछत गटांचे वेगवेगळे स्टॉल उपलब्ध करून व्यवसाय करण्यासाठी मोलाचे योगदान, महापूर, कोरोनासारख्या काळात मोफत जेवण,जीवनावश्यक वस्तू,औषधे, सँनिटाईजर मोठ्या प्रमाणावर वाटप केले. महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी वेध फाउंडेशन ची स्थापना करत  अनेक उपक्रम राबविले. यामध्ये गर्भवती महिला, नवजात शिशू,लहान मुले यांचे मोफत आरोग्य शिबीर, महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, महाशिवरात्री ला मोफत उपवाचे पदार्थ वाटप करणे, मंदिरात देणगी देणे अशा अनेक सामाजिक उपकमांमध्ये सहभागी होत बहुमोल योगदान दिले. महिलासांठी करत असलेल्या व सामाजिक कार्याची दखल घेत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त पोलिस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या महिला सचिव, हिरकणी न्यूज इचलकरंजी प्रतिनिधी, अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघाच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष,संत  रोहिदास विकास फांउडेशनच्या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक संस्था, संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्यातून पदांना न्याय देत आहेत.
सौ.रजनीताई शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मँनेजमेंटच्या वतीने सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय ज्ञानज्योती हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

हा पुरस्कार वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष,कामगार नेते मा.श्री. पुंडलिक भाऊ जाधव यांच्या हस्ते व रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षक मंडळ, मुंबईचे सदस्य श्री मिलिंद शिंदे,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मा.धनाजी यमकर,सिनेअभिनेते व जेष्ठ पत्रकार मा.दगडू माने,हिरकणी न्यूज कार्यकारी संपादक एड.सुशीला घाटगे-पवार, सिनेअभिनेता महाराष्ट्राचा लाडका पुढारी घनश्याम दरवडे,जेष्ठ सिनेअभिनेता मा.सुरेश भाऊ डोळस,सिनेअभिनेता बाळासाहेब पाटील, प्रसिद्ध कँमेरामन निलेश जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

संयोजक सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मँनेजमेंटचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ.गणेश वाईकर तर निमंत्रक सह्याद्री फिल्मस् चे उपाध्यक्ष मा.युवराज मोरे कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले,संचालिका मीना वाईकर, कार्याध्यक्ष दर्शन कोरडे, सचिव दिपक ढोणे यांनी पाहुणे आणि पुरस्कर्ते यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन/निवेदन प्रा.गायकवाड मँडम यांनी केले.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.